मी काय वाचले - 13

 










आमच्या घरी गणपती बाप्पा दर्शनासाठी आमच्या सोसायटीमध्ये राहणारी मैत्रीण आल्या होत्या. त्यांच्याकडे असलेले एक पुस्तक वाचायला दिले. हे पुस्तक तुम्हाला आवडेल. "मुलाखती तेव्हाच्या" लेखिका सौ प्रियंवदा करंडे. या पुस्तकात लेखिकीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या 1987 पासून ते 2015 पर्यंतच्या  25 मुलाखतीचा समावेश केला आहे.  साहित्य,संगीत,न्याय, अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, पत्रकार, खेळ, अभिनय, योग,कवी... मुलाखत घेणे आणि मोजक्या शब्दात लिहणे हे खरे कौशल्य आहे.  सर्व मुलाखती सुंदर आहेत आणि वाचनीय 👌आहेत.  विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तींना भेटणे, त्यांच्याशी गप्पा होणे त्यांचे विचार वाचका पर्यंत पोचवणे...खरच याला भाग्य लागते..लेखिकेचे कौतुक आणि मनापासून आभार..धन्यवाद ..🙏🙏 पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे..

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा