Posts

IIT Bombay संस्थेस भेट

Image
  10 एप्रिल 2022 - आम्ही  IIT Bombay -  पवईस भेट दिली. सकाळी ८.३० वाजता मेन गेटवर श्रेयसचा मित्र सर्वेश काळे आमच्या स्वागतास आला होता.  त्याच्या हॉस्टेल नंबर १८ येथे रिक्षा करून त्याच्या रूमवर आलो. रूमवर बॅग ठेऊन मेसमध्ये नास्ता करून आम्ही IIT परिसर पाहण्यास सुरवात केली.  प्रथम वनविहार लेक स्पॉट येथे आलो.  जाताना आजूबाजूला गर्द झाडी आहे.  येथे बसायला ४-५ बेंचेस आहेत. सकाळी आणि संध्याकाळी मुले हवा खायला आणि शांत परिसर याचा आनंद घेण्यासाठी येतात.  जाताना म्हशींचा गोठा आहे. जेवण केल्यानंतर कलादर्शन येथे चित्रांचे आणि इतर कलाकुसर यांचे प्रदर्शन बघितले.  मुलं मुलींनी काढलेले सुंदर चित्रे, कागदाची टोपी, दोऱ्यानी बनवलेली कला, थर्मोकॉल नि बनवलेल्या काही वस्तू खूपच छान होत्या. मेन बिल्डिंग - ग्रंथालय - अकॅडेमिक विभाग - लॅब रूम, क्लास रूम - इन्फिनिटी कॉरिडॉर,  विविध विभाग बिल्डिंग - हे पाहिले.  १५० वर्षापूर्वीचे एक मोठे झाड त्याच्या अवतीभवती lawn - दुपारी येथे मुले बसतात - हा भाग खूप छान आणि रमणीय आहे. इन्फिनिटी कॉरिडॉर,  ही पाहण्याजोगी ...

ती. अप्पाजी - समाधानी आणि आनंदी व्यक्तिमत्व

Image
  १३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता ती. अप्पाजी याना देवाज्ञा झाली फोन आला आणि मनास वाईट वाटले. ती. आप्पाजी म्हणजे माझे सासरेबुवा आणि वर्षाचे पिताश्री.  खूप समाधानी आणि आनंदी व्यक्तिमत्व.  आमच्या नोकरीचे ठिकाण एकच - कॅनरा बँक.. माझ्या लग्नानंतर माझे सासरे आणि सासूबाई नेहमी वर्षातून एकदा  एक ते दीड महिना वर्षाकडे येत.  माझ्या प्रत्येक बदलीच्या ठिकाणी - ती. आप्पाजी आनंदाने राहत. आजूबाजू शेजारीपाजारी यांच्याशी ओळख करून ते स्वतः गप्पा मारत. राहण्याचे ठिकाण, हवामान,परिसर या बाबी जुळवून घेत. प्रत्येक गोष्टीत कमालीची adjustment  त्यामुळे त्यांना कधीही मुक्कामात कंटाळा आला असे कधीच आढळून आले नाही. कधीही कोणताच अहंभाव नव्हता. कोणी काही म्हटले तरी ते मनात कधीच ठेऊन घेत नसत. सोडून देत. मुक्कामामध्ये बँकेत काम करीत असताना आपल्या कस्टमर, स्टाफ यांच्याबाबत गमतीजमती, प्रसंग यांचे कथन करीत. आपली जन्मभूमी - राजगोळी - या गावाविषयी अत्यंत प्रेम होते.  आपल्या नातेवाईक यांच्याबरोबर जिव्हाळयाचे नाते होते. आपल्या भाऊ आणि बहिणी यांच्या आठवणी आणि प्रसंग आठवून ते  अत्यंत भावुक ह...

श्री सुभाष अनगळ - ८६ वा वाढदिवस..

Image
  आज ८ मार्च - आपल्या अनगळ ग्रुप चे सर्वेसर्वा श्री सुभाष अनगळ यांचा ८६ वा वाढदिवस.. सरानी आज ८७ व्या वर्षात पदार्पण केले.  सरांना जीवनात तब्येतीची उत्तम साथ लाभली आहे. या वयात इतर ऑफिस कामकाज पाहणे आणि इनकम टॅक्स, GST  RERA  याबाबत माहिती करून घेणे आणि त्यात रुची ठेवणे याचे कौतुक करावे तितके कमीच.  त्यांचा स्टॅमिना दांडगा आहे. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे. केक कापल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन काम करतो म्हणून तब्येत आणि स्मरणशक्ती चांगली आहे.  देवाच्या कृपेमुळे उत्तम तब्येत लाभली याबाबत कृतज्ञता साहेबानी व्यक्त केली. मध्यंतरी सरांना बरे नव्हते तेव्हा ऑफिस सुने सुने वाटत होते. ते आल्यावर एक प्रकारचे चैतन्य असते असे नेहा मॅडम म्हणाल्या. ऑफिस मधील सरांचा चाळीस वर्षांपूर्वीचा फोटो पाहून त्यावेळची स्वप्नपूर्ती आणि यशस्वी वाटचाल आणि व्यवसायातील प्रगती पाहून सोनिया मॅडम भावुक झाल्या आणि या प्रसंगी आनंदाश्रू आले. मला वाटते हीच खरी मोलाची वाढदिवसाची भेट सरांना...सर खरंच भाग्यवान आहेत... त्यांचे भावी जीवन सुखासमाधानाचे, आरोग्यपूर्ण राहो आणि त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण...

रथसप्तमी - जागतिक सूर्यनमस्कारदिन

Image
  आज रथसप्तमी - जागतिक सूर्यनमस्कारदिन - या दिनानिमित्य आपल्या सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटीत सूर्यनमस्कार कार्यक्रम पार पडला. सोसायटीतील योगाचार्य - सौ. पल्लवी गुरव यांनी उत्तम मार्गदर्शन केले. सकाळी 6.45 वाजता सर्वानी 15 सूर्यनमस्कार घालून सूर्यदेवतेची उपासना केली.  कमिटीमधील सौ. दिशा कुलकर्णी यांनी या उपक्रमाबाबत पुढाकार घेतला. सर्वाना आरोग्यसंप्पन्न बलवान, तेजोमयी जीवन लाभो हीच श्री सूर्यनारायणास प्रार्थना..  सर्वाना रथसप्तमी दिन्याच्या स्नेहमयी शुभेच्छा,, तिळगुळ घ्या गोड बोला ...

अजूनही बाकी काही.. कवितासंग्रह

Image
  "अजूनही बाकी काही .." हा सौ. शिल्पा कुलकर्णी यांचा कवितासंग्रह वाचला. कवियित्रीचे माहेर  खानापूर तालुक्यात असणारे लोंढा.. गोवा- बेळगाव सीमेवर वसलेले "लोंढा" हे गाव निसर्गसंपन्न आहे.  संग्रहातील मी निसर्ग", जरा विसावू या वळणावर", कायापालट, पावसाळ्यातील सुकावा, या कवितेत निसर्ग सौंदर्याचे सुंदर  दर्शन घडते. जीवनात अलिप्तपणा हवा असा आशयाची कविता - बंद लिफाफे आम्ही ... ही कविता मनास खूप भावून जाते. "आधुनिक चिऊ ", "स्वप्नांत पहिला नंबर" - या कविता गंमतशीर आहेत.  "आधुनिक चिऊ " या कवितेत सद्य परिस्थितीचे चित्रण पाहायला मिळते. प्रत्येकाला आपली माय प्रिय असतेच.  आपल्या आईविषयी कितीही लिहले तरी कमीच असते.  आपल्या आईबाबत भावना व्यक्त करण्याऱ्या कविता या संग्रहात आहेतच.  "आई" ही कविता हृदयस्पर्शी आहे. या कविता संग्रहातील जवळजवळ सर्व कविता अगदी सोप्या भाषेत सगळ्याना सहज समजतील आणि भावनात्मक आहेत. अजूनही बाकी काही .. या कवितासंग्रहा नंतर बाकी पण कविता लवकरच प्रकाशित हो हीच देवाकडे प्रार्थना आणि मनापासून शुभेच्छा..

सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटी -प्रजासत्ताकदिन

Image
  सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटी मध्ये प्रजासत्ताकदिन संपन्न झाला. ध्वजारोहण सोसायटीतील मुलामुलींच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रगीतानंतर सोसायटीतील जेष्ठ नागरिक (७५ वर्ष पूर्ण) यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फुग्यांची उत्तम सजावट आणि सुंदर रांगोळी यामुळे कार्यक्रमास शोभा आली. कार्यक्रमाशेवटी सर्वाना खाऊची पाकिटे वाटप करण्यात आले. करोना बाबत योग्य ती खबरदारी आणि नियम पळून गणराज्य दिन व्यवस्थित आणि आनंदात पार पडला.  सर्वानी सिल्वर क्रेस्ट समितीचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. 26.01.2022

डॉ. सौ. आरती दातार - चातुर्मास चिंतनमाला

Image
  डॉ. सौ. आरती दातार यांनी चातुर्मास चिंतनमाला अंतर्गत ऑडिओ अगर You -tube  वर वेगवेगळ्या  विषयावर प्रवचनमाला सादर केली.  या प्रवचन मालेत - आषाढी वारी, गुरुपुर्णिमा, रामनाम मंत्र. गणेश चतुर्थी, चार आश्रम, श्रावणातले सण - नागपंचमी, गोपाळकाला, गोकुळाष्टमी, हरितालिका, ऋषिपंचमी,  शिक्षक दिन, उपासना, वाचन संस्कृती, यांचा समावेश होता. संत मंडळींमध्ये - ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, जनाबाई, विसोबा खेचर, तुलसीदास, चोखामेळा, तुकोडीमहाराज, गुलाबमहाराज, तुकाराम ... थोरयुगपुरुषात - जे कृष्णमूर्ती, योगी अरविंद, सर्वपल्ली राधाकृष्ण, ग दि मा, लोकमान्य टिळक, गुरुदेव रानडे.. ही मंडळी होतीच.   घटस्थापना - नवरात्र -  नवरात्र युग शलाकामध्ये - भामिनी, सीता, द्रौपदी, गौतमी, राजमाता जिजाबाई, भगिनी निवेदिता, पंडित रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी... बहिणाबाई यांच्या म्हणी.. याबाबत माहिती कळली.  इतर विषयामध्ये - आरतीचे महत्व, बारा पूर्णिमाचे महात्म, शरीर एक मंदिर, व्यायाम, प्रार्थना , फुलांची अध्यात्मिक महत्ता, उपासना, कर्म हे चंदन, त्रिगुणी,  संस्कृत विद्या... यांचा स...