डॉ. सौ. आरती दातार - चातुर्मास चिंतनमाला

 




डॉ. सौ. आरती दातार यांनी चातुर्मास चिंतनमाला अंतर्गत ऑडिओ अगर You -tube  वर वेगवेगळ्या  विषयावर प्रवचनमाला सादर केली.  या प्रवचन मालेत - आषाढी वारी, गुरुपुर्णिमा, रामनाम मंत्र. गणेश चतुर्थी, चार आश्रम, श्रावणातले सण - नागपंचमी, गोपाळकाला, गोकुळाष्टमी, हरितालिका, ऋषिपंचमी,  शिक्षक दिन, उपासना, वाचन संस्कृती, यांचा समावेश होता. संत मंडळींमध्ये - ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, जनाबाई, विसोबा खेचर, तुलसीदास, चोखामेळा, तुकोडीमहाराज, गुलाबमहाराज, तुकाराम ... थोरयुगपुरुषात - जे कृष्णमूर्ती, योगी अरविंद, सर्वपल्ली राधाकृष्ण, ग दि मा, लोकमान्य टिळक, गुरुदेव रानडे.. ही मंडळी होतीच.  

घटस्थापना - नवरात्र -  नवरात्र युग शलाकामध्ये - भामिनी, सीता, द्रौपदी, गौतमी, राजमाता जिजाबाई, भगिनी निवेदिता, पंडित रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी... बहिणाबाई यांच्या म्हणी.. याबाबत माहिती कळली.  इतर विषयामध्ये - आरतीचे महत्व, बारा पूर्णिमाचे महात्म, शरीर एक मंदिर, व्यायाम, प्रार्थना , फुलांची अध्यात्मिक महत्ता, उपासना, कर्म हे चंदन, त्रिगुणी,  संस्कृत विद्या... यांचा समावेश होता. 

प्रवचनमालेत विशेषतः प्रत्येक दिवसाचे महत्व आणि त्या अनुसंगे माहिती सौ. आरती ताई यांनी कथन केली. 21 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी - या दिवशी सुरु झालेली प्रवचनमालेची पालखी - १६ नोव्हेंबर २०२१ - कार्तिकी एकादशी त्रिपुरी पूर्णिमेस समाप्त झाली.  अध्यात्म, थोरपुरुषांचे समाजकार्य, युगशलाका यांचे योगदान, सणाचे महत्व, संत मंडळी, वाचन, कर्म, रामनाम मंत्र.... यासारखेच अनेक विषय थोडक्यात पण उपयुक्त माहिती, ज्ञान .. ताईंनी दिले.  बऱ्याच गोष्टी, नवीन माहिती कळली. काही प्रवचनमालेतील विषय मनास खूप भावून गेले. मनस्वी आनंद झाला. .. प्रवचनमाला म्हणजे जणू ज्ञानाची दिवाळीच होती. अध्यात्म ज्ञानात मी खूपच मागे असून मला बरेच शिकायचे आहे याची जाणीव प्रवचनमाले मुळे समजले.

प्रत्येक दिनाचे महत्व, यावर अभ्यास करून योग्य ती माहिती यांची निवड, 10 -१५ मिनिट या अवधीत सादर करणे... या आणि इतर बाबीमध्ये ताईंनी घेतलेले कष्ट...याबाबत ताईंचे कौतुक करावे तेवढे थोडकेच.. अर्थात मी एक सामान्य साधक...मी अधिक काय लिहणार म्हणा...डॉ.सौ. आरती दातार याना चार्तुमास चिंतनमाला या उपक्रमास मनापासून साष्टांग नमस्कार....  धन्यवाद ..ताईंच्याकडून अधिकाधिक प्रबोधन कार्य घडो आणि त्यांना याकामी भरपूर शक्ती लाभो हीच श्री सरस्वतीदेवीस प्रार्थना....

दररोज न चुकता ताईंनी मला व्यक्तिशः प्रवचन माला whatsapp  वर पाठवली.  दररोज देवाची पूजा करताना आम्ही  श्रवणभक्ती केली.  मनास समाधान झाले.  हा देवांनी पाठवलेला प्रसादच असेल नाही का..२०२२ मधील ब्लॉगची सुरुवात डॉ. सौ. आरती दातार यांच्या चिंतनमालेवर लिहावा असा मानस होता. तो सफल झाला. ही सारी भगवंताची कृपा... श्री राम जय राम जय जय राम....


चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी - E -३०२ सिल्व्हरक्रेस्ट हौसिंग सोसायटी कोथरूड पुणे -४११०३८

मोबाईल - 7767091069.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा