अजूनही बाकी काही.. कवितासंग्रह

 






"अजूनही बाकी काही .." हा सौ. शिल्पा कुलकर्णी यांचा कवितासंग्रह वाचला. कवियित्रीचे माहेर  खानापूर तालुक्यात असणारे लोंढा.. गोवा- बेळगाव सीमेवर वसलेले "लोंढा" हे गाव निसर्गसंपन्न आहे.  संग्रहातील मी निसर्ग", जरा विसावू या वळणावर", कायापालट, पावसाळ्यातील सुकावा, या कवितेत निसर्ग सौंदर्याचे सुंदर  दर्शन घडते. जीवनात अलिप्तपणा हवा असा आशयाची कविता - बंद लिफाफे आम्ही ... ही कविता मनास खूप भावून जाते. "आधुनिक चिऊ ", "स्वप्नांत पहिला नंबर" - या कविता गंमतशीर आहेत.  "आधुनिक चिऊ " या कवितेत सद्य परिस्थितीचे चित्रण पाहायला मिळते.

प्रत्येकाला आपली माय प्रिय असतेच.  आपल्या आईविषयी कितीही लिहले तरी कमीच असते.  आपल्या आईबाबत भावना व्यक्त करण्याऱ्या कविता या संग्रहात आहेतच.  "आई" ही कविता हृदयस्पर्शी आहे. या कविता संग्रहातील जवळजवळ सर्व कविता अगदी सोप्या भाषेत सगळ्याना सहज समजतील आणि भावनात्मक आहेत.

अजूनही बाकी काही .. या कवितासंग्रहा नंतर बाकी पण कविता लवकरच प्रकाशित हो हीच देवाकडे प्रार्थना आणि मनापासून शुभेच्छा..




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा