श्री सुभाष अनगळ - ८६ वा वाढदिवस..
आज ८ मार्च - आपल्या अनगळ ग्रुप चे सर्वेसर्वा श्री सुभाष अनगळ यांचा ८६ वा वाढदिवस.. सरानी आज ८७ व्या वर्षात पदार्पण केले. सरांना जीवनात तब्येतीची उत्तम साथ लाभली आहे. या वयात इतर ऑफिस कामकाज पाहणे आणि इनकम टॅक्स, GST RERA याबाबत माहिती करून घेणे आणि त्यात रुची ठेवणे याचे कौतुक करावे तितके कमीच. त्यांचा स्टॅमिना दांडगा आहे. त्यांची स्मरणशक्ती तल्लख आहे.
केक कापल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन काम करतो म्हणून तब्येत आणि स्मरणशक्ती चांगली आहे. देवाच्या कृपेमुळे उत्तम तब्येत लाभली याबाबत कृतज्ञता साहेबानी व्यक्त केली. मध्यंतरी सरांना बरे नव्हते तेव्हा ऑफिस सुने सुने वाटत होते. ते आल्यावर एक प्रकारचे चैतन्य असते असे नेहा मॅडम म्हणाल्या.
ऑफिस मधील सरांचा चाळीस वर्षांपूर्वीचा फोटो पाहून त्यावेळची स्वप्नपूर्ती आणि यशस्वी वाटचाल आणि व्यवसायातील प्रगती पाहून सोनिया मॅडम भावुक झाल्या आणि या प्रसंगी आनंदाश्रू आले. मला वाटते हीच खरी मोलाची वाढदिवसाची भेट सरांना...सर खरंच भाग्यवान आहेत... त्यांचे भावी जीवन सुखासमाधानाचे, आरोग्यपूर्ण राहो आणि त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्याचा योग येऊ दे हीच श्री चतुःश्रींगी देवीकडे सर्वांच्यावतीने प्रार्थना...जीवेत शरद: शतं... जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला नम्र अभिवादन...
Comments
Post a Comment