कर्नल्स क्यूब संस्थेने " MEMS - १०८

 






14 फेब्रुवारी २०२६ -  कर्नल्स क्यूब संस्थेने " MEMS  -  १०८"  या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. एम इ एम एस 108 ची टीम आली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (Maharashtra Emergency Medical Services  हा प्रोजेक्ट आरोग्य खात्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्री हॉस्पिटल हेल्थ सर्विस - लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स च्या माध्यमातून पेशंटला दिली जाते. यामध्ये रस्त्यावरील अपघात मधील पेशंट्स,  क्रिटिकल प्रेग्नेंट वूमन, नैसर्गिक आपत्ती आणि  विषबाधा, भूकंप, वीज पडून दुखापत, जंगली प्राणी यांच्यामुळे दुखापत आणि इतर आजार -.. पेशंटना प्राथमिक उपचार ॲम्बुलन्स सर्विस माध्यमातून दिली जाते. 365 दिवस आणि 24 तास ही सेवा मोफत पेशंटला दिली जाते. टोल फ्री नंबर 108 हा एम इ एम एस साठी आहे. या फोनवर घटना आणि पेशंट बाबत प्राथमिक माहिती   MEMS  सेंटरला  द्यावयाची आणि त्यानंतर त्या घटनास्थळी त्वरित (१५ मिनिटात)  ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केली जाते. घटनास्थळी घाबरून न जाता, patience ठेवून योग्य ती माहिती तपशील सेण्टरला द्यावा. सबंध महाराष्ट्र राज्यात 937 ॲम्बुलन्स कार्यरत आहेत यामध्ये 704 बेसिक लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स आणि 233 ॲडव्हान्स लाईव्ह सपोर्ट ॲम्बुलन्स आहेत. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्बुलन्स म्हणजे मिनी आयसीयू. एम ई एम एस 108 च्या टीमने दृकश्राव माध्यमातून या योजनेची संपूर्ण माहिती दिली.  Good Samaritan (आरोग्यदूत)  याबाबत विस्तृत माहिती श्रोत्यांना दिली. एकदा पेशंट  MEMS ॲम्बुलन्स ताब्यात दिल्यानंतर आपली जबाबदारी संपते पोलीस यांची कटकट नाही. एम ई एम एस टीमने ऍडव्हान्स लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स आणि बेसिक लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स मध्ये काय काय उपकरणे आणि सोयी असतात त्यांची माहिती दिली. MEMS  टीमने  "CPR "   बाबत प्रात्यिक्षिक करुन दाखवले.  संस्थेचे प्रमुख कर्नल फुले यांनी या योजनेबाबत आभार मानत काही सूचना केल्या. सर्वांनी Good Samaritan (आरोग्यदूत)  हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे आणि त्याचा गरजू व्यक्तींसाठी वापर करून सेवा उपलब्ध करून घ्यावी आणि आपले सामाजिक जबाबदारी पार पाडूया अशी विनंती केली.  या उपयुक्त आणि महत्त्वाच्या सेवेबाबत सर्वांनी "108 टीम" चे आणि संस्थेचे आभार मानले. धन्यवाद. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा