वाचनकट्टा - 5 - "कशीर" - लेखिका सहना विजयकुमार अनुवाद उमा कुलकर्णी

 





 "कशीर" - लेखिका सहना विजयकुमार अनुवाद उमा कुलकर्णी. कशीर  म्हणजे  कशूर भाषेत "काश्मीर". काश्मीर समस्या, 370 कलम त्याचा गैरवापर राजकारण, काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड, या सर्वांचे  परखड  चित्रण लेखिकेने कादंबरीमध्ये केले आहे. लेखिकेने काश्मीरमध्ये धोकादायक प्रदेशात तिथल्या गल्लीबोळात फिरून मोजक्या हिंदूंचा संपर्क साधून भयभीत हिंदू वृदांची, तरुण-तरुणीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. रक्तपात घडलेल्या स्थळांना भेटी देऊन ही कादंबरी साकारली.  2018  साली  प्रकाशित झालेली ही कादंबरी.  याच्या आतापर्यंत सहा  आवृत्या निघाल्यात. या कादंबरीस डॉ. एस एल   ल भैरप्पा यांची प्रस्तावना लावली आहे. उमा कुलकर्णी अनुवादित ही कादंबरी वाचनीय आहे.






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा