"मनाचे श्लोक व मनाचे आरोग्य - डॉ. राम साठ्ये
श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव व्याख्यान अंतर्गत "मनाचे श्लोक व मनाचे आरोग्य" या विषयावर डॉ. राम साठ्ये यांचे व्याख्यान आनंदाश्रम, अप्पा बळवंत चौक पुणे येथे आयोजित केले होते. आपला स्वतःचा आत्म्याचा, मनाचा शोध हा खरा अभ्यास. आपल्या अंत:करण शांत निर्मळ हवे. अंतःकरणातील काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ यांचे धोंडे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. संकल्प व विकल्प यांचे हिंदोळे म्हणजे मन. सतत न कंटाळता अभ्यास करून मनावर ताबा मिळवता येतो. आपल्या उत्पन्नाच्या वाट[पैकी 80 टक्के हा समाजाचा असतो. कलियुगात दानाचे महत्त्व खूप आहे दान हा सत्यसंकल्प आहे. ऐपतीनुसार दान करावे. आहे ते वाटून संपवावे. दान सातत्याने व्हायला हवे. जीवन कसे जगावे मृत्यू आणि सेवा, दासभक्ती गुरु, शिष्य आणि अनेक विषयावर विवेचन मनाच्या श्लोकात केले. मी म्हणजे देह नाही तत्वाचे चिंतन करतो तो संत. आपल्या जगण्याचे प्रयोजन काय देहातून परमात्म्याकडे जाणे. आज-काल कलियुगात कलियुगात माणूस माणसासारखा वागेल याची खात्री नाही माणसाला कशातच समाधान नाही. हनुमंतासारखी दास्यभक्ती हवी. दासबोध हा ग्रंथ ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आणि जीवनातील अनेक विषयावर विवेचन आहे. मॅनेजमेंट बाबत दासबोध हा एक उत्तम मार्गदर्शक ग्रंथ आहे. माणसे घडवणारा कारखाना म्हणजे "दासबोध" असे दासबोधाचे वर्णन महात्मा गांधी यांनी केले आहे. प्रत्येकाने दासबोध हा ग्रंथ वाचावा. मानवता ही ईश्वरसेवा आहे... श्री समर्थ यांच्या चरित्र आणि कार्याचा थोडक्यात आढावा आपली व्याख्यानात घेतला. व्याख्यान अत्यंत श्रवणीय होते.
Comments
Post a Comment