जपान -2
२4 सप्टेंबर २४ - योकोहामा
योकोहामा भागास भेट दिली. आमच्या घराजवळील मियाझाकीडाई स्टेशन वरून आम्ही मिरॅटॉमीरायी या स्टेशन साठी ट्रेन पकडली. येथे योकोहामा कॉसमॉस वर्ल्ड या ठिकाणी टोलेजंग इमारती - Queens टॉवर, काही हॉटेल्स, वॉशिंग्टन टॉवर, अश्या भव्य इमारती आहेत. येथे Amusement पार्क आहे - लहान मुलांसाठी आणि मोठ्या साठी - adventure game rides , हाउंटेड हाऊस स्पिननिंग कोअस्टर, ice वर्ल्ड, मेरि गो राऊंड, पोट्रेट स्टुडिओ, बोट फेरी, ropeway आणि असंख्य करमणुकीचे खेळ आणि साधने आहेत. आम्ही बोट फेरीमधून एक फेरफटका मारला. सर्व कॉसमॉस वर्ल्ड चे दर्शन घडले. यात योकोहामा बंदर, cruz समुद्रावरील पूल, आजूबाजूच्या इमारती आणि हॉटेल कॉसमॉस क्लॉक २१ - चे सुंदर इलेक्ट्रिकल lighting सीगल पक्षी, बोट सफारी मध्ये मी जीवनाच्या सफारीतील ६०वे स्टेशन गाठले त्यामुळे केक कापून वाढदिवस जोरात साजरा केला गेला. वर्षा आणि श्रेयस यांनी याचे नियोजन केले होते. मनास खूप आनंद झाला. हा अविस्मरणीय क्षण मी विसरू शकत नाही. नंतर रोपेवे मधून प्रवास केले. जमीन, समुद्र आणि आकाश या तिन्ही ठिकाणी सफर करीत या भागातील रमणीय भाग पाहिला.. उंच इमारती, शॉपिंग मॉल, चढणे उतरणे जिन्याची सोय, स्वच्छता, वॉशरूम, सजावट, परिसर, ट्रेन ची सोय... या साऱ्या गोष्टी मनास भावून गेल्या. योकोहामा भाग विशेषतः संध्याकाळी ६ नंतर जरूर भेट द्यावा. मजा आली.
Comments
Post a Comment