पु.ल. ची प्रार्थना

 



गेल्या आठवड्यात मी माझा ६० वा वाढदिवस साजरा केला.  वरिष्ठ क्लबात प्रवेश मिळाला म्हणून मी जपानच्या  धरतीवर हवेत तरंगत होतो. आणि अचानक  तेव्हा मला माझे लाडके पु.ल. ची प्रार्थना वाचनात आली ती अशी -


हे परमेश्वरा...मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बडबडण्याची माझी सवय कमी करआणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर. दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व  त्यांच्या खाजगी प्रश्नांची  दखल घेउन ते मीच  सोडवले पाहिजेत अशी  प्रामाणिक समजूत माझी  होऊ देऊ नकोस.   टाळता येणारा फाफटपसारा  व जरुर नसलेल्या तपशिलाचा  पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ  मुद्यावर येण्याची माझ्यात  सवय कर.   इतरांची दुःख व वेदना  शांतपणे ऐकण्यास मला  मदत करच पण त्यावेळी  माझ तोंड शिवल्यासारखे  बंद राहु दे. अशा प्रसंगी  माझ्याच निराशा, वैफल्यांचे  रडगाणे ऐकवण्याची माझी  सवय कमी कर.   केंव्हा तरी माझीही चूक  होउ शकते, कधीतरी माझाही  घोटाळा होऊ शकतो,  गैरसमजुत होऊ शकते  ह्याची जाणीव माझ्यात ठेव.   परमेश्वरा, अगदी शेवटपर्यंत माझ्यात  प्रेमाचा ओलावा, गोडवा,  लाघवीपणा राहू दे. मी संतमहात्मा नाही  हे मला माहीत आहेच,  पण एक बिलंदर बेरकी  खडूस माणूस म्हणून मी  मरू नये अशी माझी  प्रामाणिक इच्छा आहे.   विचारवंत होण्यास माझी  ना नाही पण मला लहरी  करू नकोस. दुसर्‍याला  मदत करण्याची इच्छा  आणि बुद्धी जरूर मला  दे पण गरजवंतांवर  हुकूमत गाजवण्याची  इच्छा मला देऊ नकोस.   शहाणपणाचा महान ठेवा  फक्त माझ्याकडेच आहे  अशी माझी पक्की खात्री  असूनसुद्धा, परमेश्वरा,  ज्यांच्याकडे खरा सल्ला  मागता येइल असे  मोजके का होईना  पण चार मित्र दे.   एवढीच माझी प्रार्थना...       - पु.ल.देशपांडे


पु ल खरंच हुशार होते नाही असे मला माझा मुलगा म्हणाला..शेवटी पु ल ते पु ल .. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व.. आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर शेयर करावे वाटले म्हणून हा ऑडिओ ...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा