माझा वाढदिवस - चिंतन

 





२४ सप्टेंबर २०२४ -  आज माझा वाढदिवस... मला ६० वर्षे पूर्ण झाली. माणसाच्या आयुष्यात साठीला अधिक  महत्व..आज मला प्रथम स्मरण होते ते माझ्या आई-दादांचे - त्यांच्यामुळे मी हे जग पाहू शकलो.आपण आपल्या आई-वडील यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही.


आपल्या कुटुंबातील सख्खी आणि चुलत भावंडे, नातलग, शाळा आणि कॉलेज मधील वर्गमित्र आणि मैत्रिणी, नोकरीनिमित्त विविध ठिकाणी आपले वरिष्ठ आणि सहकारीमंडळी, बदली ठिकाणी शेजारी आणि इतर जोडलेले नाती  यांचे भरपूर  प्रेम आणि आपुलकी लाभली. हे पैश्यात मोजता येत नाही. याबाबत मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. ही सारी ईश्वराचीच कृपा..


आयुष्यात साठी म्हणजे एक प्रमोशन - "वरिष्ठ" ..संत तुकाराम महाराज म्हणतात - लहानपण देगा देवा.. तेव्हा मला "वरिष्ठ" पद नको .. देवा मला लहानच राहू दे.. जीवनाच्या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्तीकडून मला खूप काही  शिकायला मिळाले.  त्यांच्याकडून लाभलेला स्नेह, आपुलकी आणि प्रेम .. यांची FD यांनी मी श्रीमंत आहे.


सर्वात शेवटचे पण महत्वाचे -  माझ्या जीवनात सावली प्रमाणे असणारी माझी पत्नी  सौ. वर्षा आणि जीवनाची काठी म्हणजे माझा मुलगा  चि श्रेयस यांच्यामुळे माझा वाढदिवस जपान येथे साजरा होतो आहे. त्या दोघांच्या सहकार्य आणि  मोलाची साथ यामुळेच मी साठी कधी गाठली कळले नाही. माझ्या कुटुंबियांच्यामुळे माझा साठावा वाढदिवस जपान देशात टोकियो शहरी साजरा होत आहे.  हा आनंदाचा क्षण मी स्वप्नातसुद्धा पाहिला नाही...ही सारी पूर्वजन्मीची पुण्याई आणि परमेश्वराची कृपा यात शंका नाही.. शेवटी आपल्या भगवदगीतेत म्हटले आहे .. योगक्षेमं वहायं...हे खरेच आहे. "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा .." असे तुकोबा म्हणतात .. त्याप्रमाणे देवा तुझा आणि मला भेटलेल्या प्रेमळ व्यक्तींचे स्मरण कायम राहू दे.. सर्वाना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा