जपान -6
पार्लिमेंट हाऊस जपान
इंटरनेटवर पार्लिमेंट हाऊस जपान बाबत शोध घेतला. १ ऑक्टोबर २४ रोजी पार्लिमेंट हाऊस टूर बाबत अर्ज केला. आणि लगेच २ ऑक्टोबर रोजी २.४५ वाजता टूर ठरली. नागाताचो भागात पार्लिमेंट हाऊस आहे. श्रेयसने आम्हाला जाणे येणे बाबत रेल बाबत माहिती दिली. आम्ही २.३० वाजता टूर ऑफिस साठी जवळजवळ ३० लोक जमा झालो. प्रत्येकाचे पासपोर्ट चेक आणि security चेकअप झाल्यावर टूर गाईड बरोबर पार्लमेंट भेट सुरु झाली. सेंट्रल हॉल, सेंट्रल एंट्रन्स, Emperor Room चेंबर ऑफ हाऊस ऑफ representatives Attendance Board committee rooms , याठिकाणी भेटी दिल्या प्रत्येक भागाची माहिती गाईडने सांगितली.काही भागात रेड कार्पेट, आजूबाजूस बाग, प्रशस्त आवार, इतर ठिकाणी टोलेजंग इमारती .. हे पाहण्याजोगे आहे. आपल्यासारखे लोकसभा (house of representative -४६५ मेंबर्स) आणि राज्यसभा (house of Councillors - २४८ मेंबर्स), लोकसभांची निवडणूक ४ वर्ष आणि राज्यसभा ३ वर्षेतून एकदा होते. १८ वर्षपुढील मतदारास २ मते द्यायची - १ त्या भागातील उमेदवारास आणि दुसरे पार्टी लिस्ट उमेदवारास. वयोमर्यादा २५ वर्ष पुढील लोकसभा आणि ३० वर्ष पुढील राज्यसभा निवडणुकीस. तरुण मंडळींना राजकरणात अजिबात आवड र नाही. महिलांचा जपानच्या राजकारणात सहभाग अतिशय नगण्य आहे. भारतीय महिला चलाख आहेत. शेवटपर्यंत आपली सत्ता (खुर्ची) सोडत नाही..(हा टोमणा नाही बरं का 🤪🤣) भारतीय महिलांना खुप वाव आणि संधी आहे. आता आगामी निवडणूक २७ ऑक्टोबर रोजी आहेत. जपानच्या पार्लिमेंट हाऊस ला Diet House म्हणतात. Diet हा लॅटिन शब्द -means common name for an assembly २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्य जपान देश्याच्या पार्लिमेंट हाऊस ला भेट देण्याचा योग आला मी नशीबवान ..🙏🏻
Comments
Post a Comment