अनगळ अँड कंपनीचा 56 वर्ष पूर्ती आणि दिवाळी सोहळा कार्यक्रम

 










21 ऑक्टोबर 2022 रोजी अनगळ अँड कंपनीचा  56 वर्ष पूर्ती आणि दिवाळी सोहळा  कार्यक्रम आयोजीत केला होता.     अनगळ कंपनीची स्थापना आणि 56 वर्ष वाटचाल पूर्ण केलेली बांधकामे याबाबत माहिती दिली. कंपनीच्या व्यवसायात यशस्वी भरारी घेताना ज्यांनी आपले योगदान देऊ केले असे सल्लागार,सप्लायर,कॉन्ट्रॅक्टर,.. यांना सर्वांना पदक देऊन कौतुक केले. याप्रसंगी विशेष 💐सन्मान आणि सोनिया madam क्रेडाई च्या पदावर निवडीबाबत सन्मान करण्यात आला. श्री सुभाष अनगळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोनिया मॅडम विशेष सन्मान आणि इतर कार्यक्रमा बाबत आपले विचार व्यक्त केले. नेहा मॅडमनी कविता सादर केली. सोहन अनगळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा मॅडमनी उत्तम👌 केले. कार्यक्रमची सांगता चविष्ट👌 भोजनांनी झाली. अनगळ कुटुंबीय आणि सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्तम आणि आनंदात पार पडला. आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभो आणि कंपनीची  भविष्यात भरभराट हो हीच श्री चतु: श्रुंगी देवीस प्रार्थना. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा