श्री अनिल देवधर ७५ वा वाढदिवस सोहळा
20 नोव्हेंबर २०२२ - आज श्री अनिल देवधर यांच्या ७५ वा वाढदिवसानिमित्त अंतराह हॉल विक्रोळी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळी होम हवन विधी शास्त्रोक्त कोकणातून गुरुजींनी पार पाडले. याप्रसंगी तुलाभार विधी झाला. तुलाभारातील शिधा हॉलनजीक असलेल्या" वात्सल्य" या संस्थेस दान म्हणून दिली गेली. नंतर विशेष बनवून घेतलेला सुंदर थीमचा (बाबा आणि आजोबा) केक कापण्यात आला. त्यांच्या एका नातेवाईकांनी एक सुंदर चित्रफीत बनवली होती. ७५ वर्षी अमृतकलाशातून अमृत प्राशन करून - १०० व्या वर्षी औदुंबर झाडाखाली बसलेले देवधर ,,ही संकल्पना खूप छान होती.
श्री देवधर यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी कॅट वॉक करत स्टेज वर येऊन उत्सवमूर्तीस शुभेच्छा देऊन फोटो कार्यक्रम होता. कविता वाचन, देवधर यांच्याविषयी आपल्या भावना मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी व्यक्त केल्या. भाग्यद लक्ष्मी .. हे कानडी गाणे, नातवंडांनी आजोबाबाबत दोन शब्द व्यक्त केले. सौ देवधर यांनी ४३ वर्ष सहजीवन, आपल्या पतिदेवांचे गुणांचे वर्णन, परोपकारी स्वभाव..या शब्दांचा सुंदर फुलांची अनोखी भेट दिली. मुलींनी आपल्या बाबांच्याबाबत मनोगत व्यक्त करून उपस्थितीत मंडळींचे मनापासून आभार मानले. भोजनाचे पदार्थ उत्तम झाले होते. सर्व खानपान चविष्ट झाले होते.
असा पंचाहत्तरीचा वाढदिवस सोहळा पाहण्याचा दुर्मिळ योग मला लाभला मी खरच नशीबवान.. काय ऋणानुबंध असतात देव जाणे...सौ पूजा (धाकटी कन्या) आपल्या कुटुंबासह अमेरिकेहून आवर्जून उपस्थित होती. सर्व नातेवाईकांनी आनंदाने सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.अर्थात याचे सारे श्रेय सौ आरती आणि देवधर कुटुंबियांना जाते. सौ. आरतीचे कौतुक करावे तितके कमीच. धन्यवाद आणि मनापासून आभार .. जीवेत शरदः शतं... चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी कोथरूड पुणे






Comments
Post a Comment