मी काय वाचले - 18
स्वर्णीम बचपन - ओशो - एक बुद्धपुरुष का विद्रोही बचपन - हे हिंदी पुस्तक. Glimpses of a Golden childhood - या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
आपल्या आजी - आजोबा यांचेबरोबर पहिले ९ वर्ष राहिले. कुचवाड गावातील निसर्ग कुशीत त्यांचे बालपण गेले. स्वातंत्र्य त्यांना बालपणी होते. काही चुकले तरी त्यांची आजी त्यांच्या पाठीशी कायम असायची. ओशोंचे बालपण जगण्यासाठी मोठे साहस आणि हिम्मत हवी. - "मधुमालती" झाडाची आठवण. संसारात संवादाला महत्व. पूर्वजन्मीची आठवण- एक गरीब पण दाम्पत्याची निवड - दोघे एकमेकाप्रति प्रेमळ आणि संतुष्ट पण गरीब दाम्पत्य.. आपल्या आई-वडिलांना एकदाही भांडलेले पाहिले नाही असे ओशो सांगतात. - पत्नी आणि स्त्री फरक - पत्नी "विकर्षित" करती है. स्त्री "आकर्षित" करती है. सातव्या वर्षी "बुद्ध" होणार ही भविष्यवाणी. - बुद्ध चा अर्थ खूप बुद्धिमान समजूतदार व्यक्ती. ओशोंचा भविष्यावर अजिबात विश्वास नाही. पाचव्या सत्रात पुस्तकात - नमो अरिहंतानं नमो नमो - जैनांचा मंत्र याचा अर्थ विस्ताराने सांगितला
ओशोंनी मृत्यूनंतर अग्नी द्यावा अशी त्यांच्या आजीची इच्छा. ८० व्या मरण पावल्यावर आजी तरुण दिसत होत्या. १२ तासानंतर ओशो पोचल्यावर ते म्हणाले - " नानी मी आलो आहे. मला माहित आहे तू काही उत्तर देणार नाहीस तरीपण मी आलो आहे." अचानक चमत्कार झाला. नानींच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. हे तिथे जमलेल्या नातेवाईकांनी पाहिले. ही आठवण ओशोनी नमूद केली आहे.
Dog 's Death - कुत्तेकी मौत- God 's Death - परमात्मा की मौत. स्वाभाविक बनो तुम परमात्मा की तरह जियोगे - परमात्मा का अर्थ = जो अपना स्वामी है!
काही विद्रोही कृत्य - मेडल्स विहिरीत फेकून दिली. सर्टिफिकेट्स जाळून टाकली.शिक्षकांना वात्रट प्रश्न विचारून भंडावून सोडत. कोठेही गेल्यावर जास्त बोलायचे, प्रश्न विचारायचे नाही तरी मुद्दाम ओशो हमखास प्रश्न विचारायचे आणि पाहुण्यांच्यापुढे वडिलांच्याबरोबर वादविवाद करायचे. यासारखे अनेक कटू गोड अनुभव या पुस्तकात आहेत. असो.या विद्रोही कृत्याचे मी समर्थन करीत नाही पण त्यांचे धारिष्ट्य कौतुकस्पद होते. विद्रोही बालक पुढे तत्वज्ञान विषयाचे प्रोफेसर बनून असंख्य व्याख्याने देऊन विसाव्या शतकातील एक महान व्यक्ती होते याचे कोडे मलाच काय अनेकांना उमगले नसेल असे मला वाटते.
हे पुस्तक जवळजवळ ६०० पानी आणि तेसुद्धा हिंदीमध्ये आहे. वास्तविक एवढे मोठ्या पानाचे पुस्तक मी वाचीत नाही. पण हे पुस्तक मला माझ्या ओशोंप्रेमी मैत्रिणीने वाचायला दिले. तेव्हा नाईलाज झाला. २०१७ साली या पुस्तकाच्या ६ आवृत्ती निघाल्या होत्या. सध्याची कोणती आवृत्ती कल्पना नाही. यावरून ओशोप्रेमी वाचक असंख्य आहेत यात शंका नाही. आजही मी ओशो यांचे वर्तमानपत्रातील आणि मासिकातील लेख आवर्जून वाचून संग्रही ठेवतो. यूट्यूब वर त्यांचे विचार, विनोद .. वगैरे १० मिनिटे तरी दररोज ऐकतोच. ओशोंचे विचार, ज्ञान याबाबत कौतुक करावे तेवढे कमीच.. ओशो म्हणजे समुद्र.. हे खरे. ओशोबाबत मी अधिक काय लिहणार म्हणा. "स्वर्णीम बचपन " हे पुस्तक वाचनीय आहे.

Comments
Post a Comment