सुनहरी यादे
कर्नल्स क्यूब यांनी सुनहरी यादे जुन्या हिंदी गाण्याच्या कार्यक्रम आयोजित केला होता. गायक डॉ.सौ. अनघा राजवाडे आणि श्री संजय मरळ होते. कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या हुताम्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. प्रथम अनघा राजवाडे यांनी सत्यम शिवम सुंदरम या गाण्याने गाण्याची सुरुवात झाली. रोमँटिक गाण्यामध्ये - ना तुम हम जाने, जो वाद कियाथा निभाना पडेगा, रहे ना रहे हम, नखरेवाली, बाबूजी धीरे चलना, आजसे पहिले आजसे जादा, सैया चलके छम छम, प्यार हुआ एक रार..याद किया तो . कहा हो तुम..तुझे जीवन की दोर से बांध, गाणी गायली. कव्वालीचे - है मेरी जोहर जबी ,,निगाहे निगाहे जी चाहता ..आणि गझल मध्ये रात है फुलों की..डम डम डिगा,, किसिकी मुस्कारो ... जीना इसिका नाम ..लावणीमध्ये चंद्रा - रात रंगी रंगुनी ..हाल कैसा है जनाब का .. कार्यक्रमाची सांगता श्री संजय मरळ यांनी भैरवी गाणे लागा चुनरी मे दाग यांनी झाली. दोघा गायकांनी तलत मेहूबुब , लता, किशोर, महंमद रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर, श्रेया घोषाल ..यांनी गायलेली गाणी म्हणून रसिकांना सुरात चिंब भिजवून सोडले. सर्व गाण्यांना रसिकांनी सुंदर साथ दिली. काहींनी बसल्याबसल्या जागीच नाच हावभाव करून दाद दिली. श्री शेखर नवाथे यांनीपण कुमार सानू गायकाचे कुछ ना कहो,, आणि तुमने मुझे देखा .. दोन गाणी गायली. हा सुरेल गाण्याचा कार्यक्रम संपूच नये असे श्रोत्यानां वाटत होते. डॉ. अनघा राजवाडे आणि श्री संजय मरळ यांच्या सुरेल गाण्याने रसिकांचे कान तृप्त झाले. या सुंदर गाण्याच्या मैफिलीत दोन तास कसे गेले कळले नाही. एक श्रवणीय गाण्याचा कार्यक्रमाबाबत कर्नल्स क्यूब यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी



Comments
Post a Comment