Posts

पुणे आकाशवाणी - "भारतरत्न" उस्ताद बिस्मिल्ला खान

Image
  २९ मे २०२२ - पुणे आकाशवाणीवर सकाळी "भारतरत्न" या कार्यक्रमात सकाळी १०.३० वाजता - उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यावर माहिती ऐकली.  वयाच्या १४ वर्षी प्रथम संगीत परिषद बनारस येथे सनई वंदन केले.  गंगेच्या घाटावर तासंतास रियाज करीत असत. संगीताला ते ईश्वर समजत. खान यांचे एकत्र कुटुंब होते. कुटुंबात ६० लोक होते. शहनाई - याला ते दुसरी पत्नी म्हणायचे.  प्रत्येकवेळी आकाशवाणीला नेहमी प्राधान्य देत कारण शेकडो श्रोते मंडळी त्यांची सनई ऐकत. देशातील सर्व आकाशवाणी केंद्राची पहाट सनईच्या सुरांनी होते. आकाशवाणीसाठी सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी सनई धून केली. आपल्या स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी त्यांना सनई साठी निमंत्रण विशेष दिले गेले.  जगात १५० देशात सनई लोकप्रिय केली.  "किनारा" , "गुंज उठी शहनाई" या चित्रपटात सनई वादन केले.  २१ ऑगस्ट २००६ रोजी सनईच्या सुरांचे चैतन्य हरपले.  आजही आपली पहाट सनईच्या सुरानीच होते. या कार्यक्रमाचे लेखन मधुसूदन पत्की आणि निवेदन श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम अत्यंत श्रवणीय होता. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यान...

पुणे आकाशवाणी - "चिंतन"

  पुणे आकाशवाणी केंद्रावर आज सकाळी ६.३० दरम्यान "चिंतन" या कार्यक्रमात श्री मकरंद वझे यांचे "संसार" याविषयावर विचार ऐकले.  आपल्या वाटेला आलेला संसार देवाच्या इच्छेने आला आहे असे समजून  आनंदाने संसार करावा. आपले कर्तव्यकर्म  नियमित करावे. एक हाताने संसार करावा आणि दुसऱ्या हाताने देवाला घट्ट धरून ठेवावे.  आपण काय करतो दोन्ही हाताने संसार करतो आणि वेळ मिळाल्यास देवाला धरण्याचा प्रयत्न करतो.  भगिनींना स्वतःचा संसार, मुलां-मुलींचा संसार असतो.  भगिनींनी वेळेची सबब न सांगता परमार्थ करावा - देवाचे नामस्मरण, जप, ध्यान जरूर केलेच पाहिजे (अर्थात आपला संसार सांभाळून हं - ...).  परमार्थात संसारापलीकडे "आत्मज्ञान " जाणणे महत्वाचे.  संसारापलीकडे आत्महित साधणे जरुरीचे आहे.  असो ऐकायला सोपे आचरणात आणणे अवघड हे खरे.. पण "चिंतन" चिंतनीय श्रवणीय होते. सर्व महिला आपापला संसार उत्तम करीत आहातच ..(संसारात स्त्रियांना 'रिटायरमेंट' नसते) हे कौतुकास्पद आहेच.. परमात्मा आपल्या हृदयात नेहमीच वास करो हीच प्रार्थना...श्री राम जय राम जय जय राम ...

"कुटुंब" आणि "चहा" दिन साजरा

  आज प्रवीणच्या घरी(बंगल्यावर) कोथरुडवासीय कुटुंबाचे स्नेह-भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. बऱ्याच दिवसानी आम्ही एकत्र भेटलो, गप्पा झाल्या. भोजनात - भाकरी, पोळी , भरली वांगी, पिठले, चवळी उसळ, कोशिंबीर, पापड, मिरची सांडगे, लिंबाचे/आंब्याचे लोणचे,  मिरची ठेचा, शिरा, मसाले भात, दही भात, दही ताक, आंबील,.. ताटभरुन पदार्थ होते.  भोजनानंतर Ice-क्रीम आणि  मसाला पान जोडीला होतेच. भोजनातील सर्व अन्नपदार्थ रुचकर आणि चविष्ट होते.  प्रेमाने आणि आग्रहाने वाढल्यामुळे सर्वानी भरपेट पोटपूजा केली. जेवण झाल्यावर सौ. मनीषा वाहिनी, सौ. वर्षा, सपना आणि पियुष यांनी गाणी म्हटली, खूप मजा आणि आनंद झाला. आम्ही जवळजवळ १८ जण जमलो होतो. प्रत्येक कुटुंबांनी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. संध्याकाळी चहा घेऊन पाच वाजता  परत भेटू असे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.  जाताना जेवताना ताटात जागा नसल्यामुळे सर्वाना पुरण पोळी पार्सल दिले गेले.  या कार्यक्रमाचे आयोजन बाबत आपल्या उत्साही (वयाची सत्तरी पार केलेल्या) ती. सौ. सुषमा काकूंनी पुढाकार घेतला आणि सौ मनीषावहिनी यांचे नियोजन.  आ...

स्वाध्याय परिवाराच्या लाडक्या ताई

Image
  नेहमी हसत खेळत, समाजात रुग्णांना उत्तम नर्स, सेवाभाव देण्याऱ्या प्रसन्न, चविस्ट स्वयंपाक बनवणाऱ्या, स्वाध्याय परिवारास वाहून घेतलेल्या, परिवारात प्रसन्न लाडक्या ताई म्हणजेच " नर्मदा ताई घुले" मी बँकेत असताना शिरूर येथे २००३ साली माझी बदली झाली असताना त्यांचे खाते बँकेत होते तेव्हा आमची प्रथम गाठ-भेट झाली. बँकेत आल्यावर एक सामान्य ग्राहकाप्रमाणे त्या आपले काम स्वतः करून जात असत.गर्दी असलीतरी त्या सामान्य ग्राहकाप्रमाणे वाट पाहून काम झाल्यावर जात.  माझ्या ३ वर्ष कालावधीत मला कोणतेच  स्वतःचे अगर इतर ओळखीतल्या लोकांचे काम करा असा आग्रह अजिबात केला नाही.  शिरूर आरोग्य केंद्रात त्यांनी प्रामाणिकपणे "नर्स" पदावर उत्तम नोकरी केली. आपल्या तऱ्हेवाईक रुग्णाची सेवा करताना  त्यांच्या मुखावर चिडचिड भाव नव्हता उलट त्या नेहमी प्रसन्न असत. जे का रंजले गांजले ...हा अभंग ताईंनी आचरणात आणला होता. श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे काम त्या नोकरी,आपले घरकाम सांभाळून निरपेक्ष पणे करत. दर शुक्रवारी मंदिरात स्वाध्याय पाठ असे नंतर आरती प्रसाद असे. मी कधी कधी ऑफिस...

श्रीया साखरपुडा समारंभ

  ०८ मे २०२२ - श्रीया आणि विनीत यांचा साखरपुडा समारंभ गजानन मंगल कार्यालय, सातारा येथे संपन्न झाला. कार्यालयातील हॉल मोठा, सजावट छान, जेवणखाण पदार्थ उत्तम होते. विधी आणि इतर संमेलन कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पडले.  साखरपुडा विधी दरम्यान अंगठी बोटात घालताना विनीत खूप भावूक झाला.  बऱ्याच दिवसाचे स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान आणि देवाप्रती आणि आपल्या आईवडील आणि नातलग याबाबत कृतज्ञता  यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. कदाचित साखरपुडयाचा उत्तम सोहळा सुद्धा अश्रुना पाहावयाचा असेल म्हणून आनंदाश्रू....असतील नाही का...? खरंच लग्नाच्या गाठी परमेश्वर बांधत असतो... विनीतचे नातेवाईक आणि इतर हितचिंतक असे एकूण ५५ मंडळी येवला येथून रात्रीचा बस प्रवास करून सकाळी ९ वाजता सातारा येथे भारत रेसिडेन्सी येथे आली.  काही अवधीतच सर्व मंडळी आटोपून मंगल कार्यालयात हजर झाली. साखरपुडा समारंभ आटोपून संध्याकाळी ६ वाजता आपल्या गावाकडे प्रयाण केले. लांबचा बस प्रवास, गर्मीचे दिवस..असलेतरी सर्व मंडळी आनंदी, समाधानी, प्रसन्न होती. याचे मला कौतुक वाटले. मी स्वागत आणि निरोप प्रसंगी हजर होतो...

आरतीताईं घाटपांडे श्रद्धांजली

  २५ एप्रिल २०२२ - सकाळी ५.४५ वाजता छोटूचा फोन आला. सौ आरती वाहिनी देवाघरी गेल्या. ऐकून मनास वाईट वाटले.  आम्ही जेव्हा घाटपांडे वाड्यात जाऊ तेव्हा हसून स्वागत करून चहापाणी करत. माझी भाची तेजू हिच्या साखरपुडा कार्यक्रम आटोपून आम्ही श्री घाटपांडे यांच्या गाडीतून कोल्हापूर - पुणे प्रवास केला. त्यावेळी सौ. आरती ताई यांच्याशी गप्पा झाल्या. गप्पा मुले पुणे कधी आले कळले नाही. परत जाने २०२० महिन्यात तेजाचे लग्न आटोपून आम्ही नागपूर- पुणे ट्रेन प्रवास केला. ट्रेन मध्ये प्रवासात  आरती ताईंशी खानपान, गप्पा झाल्या.  आरती ताईंचा स्वभाव मनमोकळा, नेहमी हसतमुख आणि गप्पिस्ट.. त्यांच्या जाण्यामुळे मला वाटते सर्वानी एक "लाडक्या ताईस"  गमावले. शेवटी आपले आयुष्य म्हणजे प्रवास.. या प्रवासात आपण नात्यांचे अनेक डब्बे जोडत असतो. त्यांच्याशी आनंदाने प्रवास करून जीवन मजेत जगत असतो.  काही डब्बे आधीच आपणास सोडून अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोचतात. ईश्वरी इच्छा बालियाशी..असो वैकुंठाचा प्रवास करण्याआधी अंत्यसमयी आरतीताईंच्या मातोश्रींच्या विरहाचा शोक व्यक्त केला. तेव्हा सर्वांच्या डोळय...

IIT Bombay संस्थेस भेट

Image
  10 एप्रिल 2022 - आम्ही  IIT Bombay -  पवईस भेट दिली. सकाळी ८.३० वाजता मेन गेटवर श्रेयसचा मित्र सर्वेश काळे आमच्या स्वागतास आला होता.  त्याच्या हॉस्टेल नंबर १८ येथे रिक्षा करून त्याच्या रूमवर आलो. रूमवर बॅग ठेऊन मेसमध्ये नास्ता करून आम्ही IIT परिसर पाहण्यास सुरवात केली.  प्रथम वनविहार लेक स्पॉट येथे आलो.  जाताना आजूबाजूला गर्द झाडी आहे.  येथे बसायला ४-५ बेंचेस आहेत. सकाळी आणि संध्याकाळी मुले हवा खायला आणि शांत परिसर याचा आनंद घेण्यासाठी येतात.  जाताना म्हशींचा गोठा आहे. जेवण केल्यानंतर कलादर्शन येथे चित्रांचे आणि इतर कलाकुसर यांचे प्रदर्शन बघितले.  मुलं मुलींनी काढलेले सुंदर चित्रे, कागदाची टोपी, दोऱ्यानी बनवलेली कला, थर्मोकॉल नि बनवलेल्या काही वस्तू खूपच छान होत्या. मेन बिल्डिंग - ग्रंथालय - अकॅडेमिक विभाग - लॅब रूम, क्लास रूम - इन्फिनिटी कॉरिडॉर,  विविध विभाग बिल्डिंग - हे पाहिले.  १५० वर्षापूर्वीचे एक मोठे झाड त्याच्या अवतीभवती lawn - दुपारी येथे मुले बसतात - हा भाग खूप छान आणि रमणीय आहे. इन्फिनिटी कॉरिडॉर,  ही पाहण्याजोगी ...