श्रीया साखरपुडा समारंभ

 


०८ मे २०२२ - श्रीया आणि विनीत यांचा साखरपुडा समारंभ गजानन मंगल कार्यालय, सातारा येथे संपन्न झाला. कार्यालयातील हॉल मोठा, सजावट छान, जेवणखाण पदार्थ उत्तम होते. विधी आणि इतर संमेलन कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पडले.  साखरपुडा विधी दरम्यान अंगठी बोटात घालताना विनीत खूप भावूक झाला.  बऱ्याच दिवसाचे स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान आणि देवाप्रती आणि आपल्या आईवडील आणि नातलग याबाबत कृतज्ञता  यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. कदाचित साखरपुडयाचा उत्तम सोहळा सुद्धा अश्रुना पाहावयाचा असेल म्हणून आनंदाश्रू....असतील नाही का...? खरंच लग्नाच्या गाठी परमेश्वर बांधत असतो...


विनीतचे नातेवाईक आणि इतर हितचिंतक असे एकूण ५५ मंडळी येवला येथून रात्रीचा बस प्रवास करून सकाळी ९ वाजता सातारा येथे भारत रेसिडेन्सी येथे आली.  काही अवधीतच सर्व मंडळी आटोपून मंगल कार्यालयात हजर झाली. साखरपुडा समारंभ आटोपून संध्याकाळी ६ वाजता आपल्या गावाकडे प्रयाण केले. लांबचा बस प्रवास, गर्मीचे दिवस..असलेतरी सर्व मंडळी आनंदी, समाधानी, प्रसन्न होती. याचे मला कौतुक वाटले. मी स्वागत आणि निरोप प्रसंगी हजर होतोच. नाहीतर मी पुणे-सातारा दिवसाचा -अडीच तासाचा प्रवास -  ऊन येते त्याबाजूची बसायला जागा, गर्मी, टोल येथील रांग, ट्रॅफिक जाम.. वैगरे बाबीमुळे मनात चिडचिड...तरी माझी सौ. मला (नेहमी) आणि धाकटी बहीण(अधून मधून) चिडू नका .. असे बजावत असतात. असो. 


श्रीया आणि विनीत यांना हार्दिक शुभेच्छा.. बाकी लग्न सोहळा आनंदात पार पडणारच आणि सर्व मंगल होणार हीच श्री गजाननास प्रार्थना.. बाकी श्री समर्थ आहेतच... शुभम भवतु...


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा