आरतीताईं घाटपांडे श्रद्धांजली

 


२५ एप्रिल २०२२ - सकाळी ५.४५ वाजता छोटूचा फोन आला. सौ आरती वाहिनी देवाघरी गेल्या. ऐकून मनास वाईट वाटले. 

आम्ही जेव्हा घाटपांडे वाड्यात जाऊ तेव्हा हसून स्वागत करून चहापाणी करत. माझी भाची तेजू हिच्या साखरपुडा कार्यक्रम आटोपून आम्ही श्री घाटपांडे यांच्या गाडीतून कोल्हापूर - पुणे प्रवास केला. त्यावेळी सौ. आरती ताई यांच्याशी गप्पा झाल्या. गप्पा मुले पुणे कधी आले कळले नाही. परत जाने २०२० महिन्यात तेजाचे लग्न आटोपून आम्ही नागपूर- पुणे ट्रेन प्रवास केला. ट्रेन मध्ये प्रवासात  आरती ताईंशी खानपान, गप्पा झाल्या.  आरती ताईंचा स्वभाव मनमोकळा, नेहमी हसतमुख आणि गप्पिस्ट.. त्यांच्या जाण्यामुळे मला वाटते सर्वानी एक "लाडक्या ताईस"  गमावले. शेवटी आपले आयुष्य म्हणजे प्रवास.. या प्रवासात आपण नात्यांचे अनेक डब्बे जोडत असतो. त्यांच्याशी आनंदाने प्रवास करून जीवन मजेत जगत असतो.  काही डब्बे आधीच आपणास सोडून अंतिम मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोचतात. ईश्वरी इच्छा बालियाशी..असो

वैकुंठाचा प्रवास करण्याआधी अंत्यसमयी आरतीताईंच्या मातोश्रींच्या विरहाचा शोक व्यक्त केला. तेव्हा सर्वांच्या डोळयात अश्रू होते. दुःख व्यक्त केल्यानंतर आईनी स्तोत्र म्हटली. आणि भगवदगीतेचा १८ वा अध्याय पुस्तकात बघून म्हटला.  शेवटचा शलोक - यत्र योगेश्वर .. हा तीनदा म्हणाला..माऊलीची आर्तता आणि प्रार्थना आरतीताईंच्या मातेचे कौतुक वाटले. कमालीचा संयम ... मी देहास फुल वाहून  मनोमनी त्या थोर माऊलीस मनापासून साष्टांग नमस्कार केला.  खरंच भगवदगीता दुःख पचवण्याची शक्ती देते..सुखात आणि दुःखात जीवन कसे जगावे  हे भगवदगीता शिकवते नाही का ..?असो काळ हेच दुःखावर औषध असते..

आरतीताईंच्या आत्मास शांती लाभो ..अनिरुद्ध ,अदिती आणि समस्त शोकमायी परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच श्री रामाकडे प्रार्थना.. श्री राम जय राम जय जय राम...ओम शांती


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा