स्वाध्याय परिवाराच्या लाडक्या ताई

 







नेहमी हसत खेळत, समाजात रुग्णांना उत्तम नर्स, सेवाभाव देण्याऱ्या प्रसन्न, चविस्ट स्वयंपाक बनवणाऱ्या, स्वाध्याय परिवारास वाहून घेतलेल्या, परिवारात प्रसन्न लाडक्या ताई म्हणजेच " नर्मदा ताई घुले"

मी बँकेत असताना शिरूर येथे २००३ साली माझी बदली झाली असताना त्यांचे खाते बँकेत होते तेव्हा आमची प्रथम गाठ-भेट झाली. बँकेत आल्यावर एक सामान्य ग्राहकाप्रमाणे त्या आपले काम स्वतः करून जात असत.गर्दी असलीतरी त्या सामान्य ग्राहकाप्रमाणे वाट पाहून काम झाल्यावर जात.  माझ्या ३ वर्ष कालावधीत मला कोणतेच  स्वतःचे अगर इतर ओळखीतल्या लोकांचे काम करा असा आग्रह अजिबात केला नाही.  शिरूर आरोग्य केंद्रात त्यांनी प्रामाणिकपणे "नर्स" पदावर उत्तम नोकरी केली. आपल्या तऱ्हेवाईक रुग्णाची सेवा करताना  त्यांच्या मुखावर चिडचिड भाव नव्हता उलट त्या नेहमी प्रसन्न असत. जे का रंजले गांजले ...हा अभंग ताईंनी आचरणात आणला होता.

श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे काम त्या नोकरी,आपले घरकाम सांभाळून निरपेक्ष पणे करत. दर शुक्रवारी मंदिरात स्वाध्याय पाठ असे नंतर आरती प्रसाद असे. मी कधी कधी ऑफिस झाल्यावर जात असे. मला आरती आणि प्रसाद खूप आवडत असे. पाठ झाल्यावर ताई आपल्या घरी आम्हास चहापानासाठी आग्रहाने बोलवत. ताईंच्या पोह्याची चव अजुनी माझ्या स्मरणात आहे. त्यांचे स्वयंपाक-पाणी करणे उत्तमच.."कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु ..".हाच हेतू मनात ठेऊन ताईंनी स्वाध्याय परिवाराचे कार्य केले. हे काम करत असताना परिवारातील अनेक ताई आणि भाऊ यांच्या अडीअडचणीत वेळोवेळी  निरपेक्षपणे मदत करून परिवारांना प्रेम देऊन आपुलकी निर्माण केली.  ताईसारखी व्यक्ती लाभली स्वाध्याय परिवार खरच नशीबवान..नदीसारखे आपले जीवन व्यतीत करून ताईंनी "नर्मदा" नाव सार्थ केले. स्वाध्याय परिवारात मानाचे स्थान मिळवले.  माणसाकडे नुसताच बंगला,गाडी,संपत्ती असून चालत नाही तुम्ही समाजासाठी निरपेक्षपणे समाजकार्य करणे हे महत्वाचे.. नाही का ..ताई सारख्या संतवृत्तीच्या माणसाचा सहवास लाभणे म्हणजे महदभाग्यच..या बाबतीत श्री पाटोळेभाऊ आणि कुटुंब नशीबवान..

एप्रिल २०२२ महिन्यात पुण्यात कार्यक्रमानंतर त्यांनी श्री पाटोळे भाऊ कुटुंबासह आमच्या घरी धावती भेट दिली.  जवळजवळ १६ वर्षानंतर आमची गाठ पडली. ताई अजुनी प्रसन्न -आहेत तश्या आहेत असे मी श्री पाटोळेभाऊना म्हणालो.  ताई वयाची ७५ पाशी पोचल्या असल्यातरी ताई तरुणांना लाजवतील असे अजुनी काम करतात.. स्वाध्याय परिवाराचे काम आनंदाने करतात.. असे मला श्री पाटोळे भाऊ म्हणाले. आणि त्यांचे चैतन्य पाहून मी थक्कच झालो.

ताई वयाची ७५ पूर्ण करतात वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा.. त्यांना भावी जीवनात सुख शांती, समाधान आणि सुआरोग्य लाभो..आपल्या आयुष्यात शंभरी गाठो.. शंभरीचा वाढदिवस कार्यक्रमाचे आमंत्रण मला श्री भाऊंकडून येवो हीच श्री योगेश्वरकडे मनापासून प्रार्थना.. जीवेत शरदः शतं..           जय योगेश्वर...

चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी  कोथरूड पुणे 




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा