"डॉ. कलाम यांच्या सहवासातील आठवणी" - श्री राजाभाऊ बोरोटीकर

 







Low aim is a crime, simple living and high thinking   ...माणसाने नेहमी उच्च स्वप्ने पहावीत असे उद्गार डॉ. एपीजे कलाम नेहमी सांगत. असे मत श्री राजाभाऊ बोरोटीकर यांनी "डॉ. कलाम यांच्या सहवासातील आठवणी"  या कार्यक्रमात व्यक्त केले. श्री  राजाभाऊ बोरोटीकर यांनी जवळजवळ 14 वर्षे डॉ. कलाम यांच्या समवेत ऑडिटचे काम केले. भारत सरकारच्या CAG  विभागात असताना डीआरडीओ यांचे सुपर ऑडिट काम करताना आपला बराच वेळ डॉ. कलाम यांच्या सहवासात व्यतीत केला. डीआरडीओ यांचे प्रमुख पदी काम करताना, कामाची पद्धत, आपले नेहमीच दररोजचे रुटीन, नवनवीन शोध, आपला पोशाख आणि राहणीमान, स्वभाव, याबाबत आठवणी जागवल्या. आपली   केशरचना, राष्ट्रपती बनण्यापूर्वी संमती, अविवाहितपणा  आणि इतर व्यक्तिगत पैलूबाबत अनेक मजेशीर किस्से, आठवणी व श्रोत्यांसमोर सादर केल्या. आपले राष्ट्रप्रेम, देशाची सुरक्षा, कामातील तळमळ, बालपणातील आपले गुरुजन आणि मित्र याबाबतच्या डॉ. कलाम यांनी कथन केलेल्या आठवणी सांगितल्या. आपल्या संवादात   धर्माबाबत कोणताच उल्लेख कधीच  नसायचा. माणुसकी हाच खरा धर्म याचे पालन डॉ. कलाम नेहमीच करत. सुपर ऑडिट म्हणजे काय त्याचे फायदे काय? value for money ..  यावर अधिक माहिती देऊन. ज्या त्रुटी कामात असतील त्या डॉ. कलाम साहेबांच्या नजरेसमोर आणून  दिल्या. देशाच्या पाच क्षेपणास्त्र याबाबत थोडीफार माहिती सांगितली. राष्ट्रपती झाल्यानंतर डीआरडीओने बनवलेल्या पाची क्षेपणास्त यांचे मॉडेल आपल्या सही सहज डॉ. कलामसाहेबानी श्री राजाभाऊ बोरोटीकर यांना आठवण म्हणून भेट दिल्या.  यापैकी आपल्या जवळ असलेले "पृथ्वी"  मिसाईलचे मॉडेल साऱ्या श्रोत्यांना दाखवले. दीड तासाच्या कार्यक्रमात श्री बोरोटीकर यांनी महत्त्वाच्या आणि पैलू .. रसाळ पूर्वकआठवणी  श्रोत्यांना सांगितल्या. सारे श्रोते तल्लीन होऊन भाषण ऐकत होते. व्यासंगी आणि आदरणीय डॉ. कलाम यांच्या आठवणी उत्तम प्रकारे श्री राजाभाऊ बोरोटीकर यांनी सादर केल्या याबाबत  धन्यवाद देत या  सुंदर👌🏻 कार्यक्रमाचे संयोजन केल्याबद्दल श्री रवींद्र पर्वते आणि श्री रघुनाथ लातूरकर यांना धन्यवाद देत आभार प्रदर्शन सौ. सपना पाटील यांनी केले. या श्रवणीय कार्यक्रमाबाबत साऱ्या सभासदांनी सिल्वर सिल्वर क्रेस्ट सोसायटी कमिटीस धन्यवाद 🙏🏻देत आभार मानले. असा कार्यक्रम परत आयोजित केला जावा असे मत सर्वानी व्यक्त केले.  चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी  E-302  सिल्वरक्रेस्ट सोसायटी.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा