वाचनकट्टा -17 " पोर्टफोलिओ " - ले. भानू काळे

 







पुस्तकाचे नाव वाचून हे आर्थिक क्षेत्रातील पुस्तक असावे असे वाटते. पण लेखक नमूद करतात - म्हातारपणाची तरतूद आणि इतरही अनेक कारणांसाठी आर्थिक गुंणवणूक ही प्रत्येकाला करावी लागते. कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंडस्, बँकांच्या मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी अशा विविध ठिकाणी ती प्रत्येक जण आपापल्या गरजेप्रमाणे करत असतो. आर्थिक परिभाषेत अशा विविध ठिकाणच्या गुंतवणुकीला एकत्रित स्वरुपात 'पोर्टफोलिओ' असे म्हटले जाते. पण अशा आर्थिक गुंतवणुकीइतकीच, कदाचित त्याहूनही अधिक महत्त्वाची असेत ती माणसांमधील गूंतवणूक. चांगल्या माणसांशी आपण जोडले जाणे हे सुखी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. अशी माणसे आपले जीवन अनेक अर्थांनी सुमुद्ध, अर्थपूर्ण करत असतात.

लेखक श्री भानू काळे हे "अंतर्नाद" मासिकाचे संपादक. अनेक माणसे लेखकाच्या आयुष्यात आली. अशा काही माणसाविषयी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे हे सकलन आहे. या पुस्तकात २६ व्यक्तीचित्रे लेख आहेत. जवळजवळ सर्व लेख वाचनीय आहेत. काही थोर माणसाविषयी प्रथमच माहिती कळाली.  काही व्यक्तींचे असामान्य गुण पुस्तकामुळे कळले. पुस्तकातील  लेखांपैकी - मुकुंद किर्लोस्कर, पंडित अरविंद गजेंद्रगडकर, दत्त हलसगीकर, रामकृष्ण नायक, देवकिसन सारडा, सुरेश हुंदरे, शिवशंकरभाऊ, रावसाहेब शिंदे, विलास चाफेकर, यांचे लेख विशेष आवडले. जे आर डी च्या सहवासात - एक अविस्मरणीय आनंदयोग - या लेखातील जेआरडी यांचे मोठेपण मनास भावून जाते. श्री भानू काळे यांचे लेखन उत्तम आणि वाचनीय आहे.  हे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे. 







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा