वाचनकट्टा -18 - अंतरीचे धावे .. ले. भानू काळे

 





लेखक हे  अंतर्नाद मासिकाचे संपादक. या पुस्तकात अंतर्नादसाठी लिहिलेल्या काही लेखांचा हा संग्रह आहे. लेखकाच्या जीवनात भेटलेली माणसे, वाचलेली पुस्तके, पाहिलेले चित्रपट, कार्यक्रम याचा समावेश आहे.  या पुस्तकातील 33 लेखापैकी सलाम इंडिया टुडे, जपान मारुती आपण आणि ते, असाही एक भारत भाग्यविधाता, त्याची बाग फुलून आली, एक संध्याकाळ बेस्ट सेलर च्या सहवासात, एक छोटुकले  मोठे मासिक, जेआरडी टाटा आणि शास्त्री, कमी बोला - जास्त  ऐका   .. हे  लेख वाचनीय आहेत. असाही एक भारत भाग्यविधाता या लेखांमध्ये ऑर्थर कॉटन या कर्तबगार  इंग्रजी अधिकारा बाबतचे लेखन उत्तम आहे. भारतातील प्राणी प्रश्न सोडवण्याचा ध्यास या माणसाने घेतला. राजमुद्री गावापासून गोदावरी नदीवर धरण बांधले. विशाखापट्टण बंदर आणि इतर नदी जोड प्रकल्प यामध्ये मोलाचे  कामगिरी केली. एक संध्याकाळ बेस्ट सेलरच्या सहवासामध्ये जेफ्री ऑर्चर या लेखकाच्या भेटीचा कार्यक्रम  याचा उल्लेख आहे. या लेखकांनी 11 कादंबऱ्या,  तीन कथासंग्रह, दोन नाटके लिहिली आहेत. 34 वर्ष सतत बेस्ट सेलर म्हणून जेफ्री ऑर्चर गाजलेला आहे.  साहित्याबाबत लेखकाचे चिंतन खूप मनास भावून जाते. पुस्तकातील सर्वच लेख वाचणे आहेत पुस्तक  संग्रही  ठेवण्याजोगे आहे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा