माझे वाचन - 5 -भावांजली - भा द.खेर
"भावांजली" - भा द.खेर
या पुस्तकात लेखकाच्या जीवनात भेटलेल्या राजकारणी,साहित्यिक आणि थोर व्यक्तिमत्व यांचे अनुभव लेखकाने सादर करून आपला भाव व्यक्त केल्या आहेत. जीवनाबाबत एक लेखात लेखकांनी एका कादंबरीतील एका प्राचार्याचा दाखल नमूद केला आहे. तो असा :
जीवनाचं अगदी साधेसुधं तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना सांगताना लडलो साहेब नेहमी म्हणायचे, "अरे, आपल्या जीवनाचे वाटलेले पत्ते घेऊनच आपण येथे आलो आहोत, काहींच्या हातात चांगली पानं असतील, काहींच्या हाती वाईट पान गेली असतील. हे पत्ते हाती घेऊन तुम्ही चांगली खेळी करता किंवा नाही याचं मला महत्त्व वाटत नाही. मला महत्व वाटतं, ते या गोष्टीचं की जीवनाचा खेळ तुम्ही सन्मानानं खेळणार आहात किंवा नाही! या जगात तुम्हाला तेच शिकायचं आहे"
आपल्या वाट्याला आलेला जीवनाचा खेळ माणसानं मोठ्या सन्मानान खेळायला हवा! इथे पात्रतेचा अपात्रतेचा संबंधच कुठे येतो? आणि त्यासाठी लटका दंभाचार हवा आहे कशाला? हा सारा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आहे. तो खेळ खेळणारा वेगळाच आहे. त्या खेळात 'मी' कुठेच नसतो.
मनोहर माळगावकर विश्व विख्यात,"दि प्रिन्सेस" या कादंबरीतील ऐका इंग्रजी प्राचार्यांचा दाखला...




Comments
Post a Comment