कानपुर ट्रीप - 29.04.2023
२९.०४.२०२३ रोजी सकाळी बिठूर या ठिकाणी भेट दिली. बिठूर हे कानपुरपासून १८ km आहे. बिठूर येथे गंगा नदी वाहते. येथे परत गंगा काठी बोटीतून एक फेरी मारली. येथेपण घाट आहेत. कालेश्वर येथे महादेवाचे, ब्रह्मवर्त मंदिर आहे. ब्रह्मदेवाचे या जागेस पाय लागले म्हणून मंदिरात पादुका आहेत. महर्षी वाल्मिकी आश्रम - येथे लव कुश यांचा जन्म झाला. हे पहिले. यानंतर पेशवे स्मारक भवन बघितले. १८५७ च्या क्रांतीचे नायक नानासाहेब धोंडोपंत पेशवे यांचे स्मारक सुंदर बांधले आहे. आजूबाजू बाग आहे. पुरातन पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय आहे. वाटेत राधा-माधव आश्रम बघितला.
राधा माधव मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराबाजूस डोंगर - गुफा बनवली आहे. या गुफेत शबरी आश्रम आणि इतर रामायणातील देखावे बनवले आहेत. वाघ-सिंह डरकाळी आणि अन्य प्राण्याचे आवाज रेकॉर्डिंग केले आहे. अगदी मान वाकून गुहेतून काही ठिकाणी जावे लागते. पण ही गुफा खूप सुंदर बनवली आहे. आजूबाजूचा परिसर रमणीय आहे. हे मंदिर आणि बिठूर जरूर पाहण्यासारखे आहे.




































Comments
Post a Comment