पुस्तक वाचन - 5
"पत्रास कारण की ......". ले. अरविंद जगताप
श्री अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे आणि सागर कारंडे यांनी चला हवा येऊ द्या .. या टीव्ही मालिकेत त्यांची पत्रे वाचून दाखवली गेली .पुस्तकात लेखकांनी विविध विषयावर - सामाजिक शैक्षणिक राजकीय खेळ संगीत गायक याबाबत पत्र लेखन केले आहे. पुस्तकाची अर्पण पत्रिका वाचनीय आहे. पुस्तकात लेखकाने आपले मनोगत खूप विस्तृत आणि सुंदर व्यक्त केले आहे. पत्र लिखाण बाबत झालेला बदल, मोबाईल नसताना पत्राचे महत्व यामध्ये झालेला भावनिक बदल स्त्रियांचे प्रश्न अडचणी, सामाजिक उपेक्षा तिचे गौण स्थान ..पुरुषी अहंकार याबाबत विचार व्यक्त करून पुरुष वर्गास चांगलेच चिमटे काढले आहेत .पुस्तक वाचनीय आहे.


Comments
Post a Comment