सावरकरांची अंदमानातील कविता
तू सूर्याचे तेज - स्वातंत्रवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड - या कार्क्रमाअंतर्गत रविवार २८ मे २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता "सावरकरांची अंदमानातील कविता " सादरकर्त्या प्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांचा कार्यक्रम पंडित फार्म पुणे येथे होता. १९०१ सालची वृषोक्ती ही बैलावरची कविता, रानात वाट चुकलेले कोकरू, लक्ष्मीपूजन कविता, बंदिवासात - माझे मृत्यूपत्र, एकलकोंडी, बेडी, सायंघन्टा समुद्रमार्ग, निद्रे, १९१३ साली रवींद्रनाथ टागोर याना नोबेल पुरस्कार मिळाल्यावर गुलाब फुलावरची कविता, श्री शिवाजी महाराज यांची आरती, सागर आणि नभ कविता, बंदी कविता .. या कवितेची पार्श्वभूमी आणि अर्थ सौ. धनश्री लेले यांनी उत्तम व्याख्यान दिले. जवळजवळ २५०० सावरकरप्रेमी जीवाचे कान करून भाषण ऐकत होते. दोन तास सुंदर श्रवणीय भाषणानंतर आम्ही नि शब्द ...कार्यक्रमात ध्वनी योजना, टीव्ही प्रक्षेपण, आसन, पंखे ..यांची उत्तम सोय केली होती. कोटीभास्कर ग्रुप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. २८ मे श्री स्वातंत्रवीर सावरकर याना मनापासून विनम्र अभिवादन आणि कृतज्ञापूर्ण साष्टांग नमस्कार....
.jpeg)



















Comments
Post a Comment