महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
14 जानेवारी 2023 - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला संध्याकाळी साडेपाच वाजता गेलो होतो. उपांत्य फेरी आणि अंतिम सामना पहिला. आत स्टेडियम खचाखच भरले होते. मैदान आणि आजूबाजू, प्रकाश योजना, प्रवेशद्वार..बाहेर projector screen,.. माईक.. स्कोअर बोर्ड.. generator,भव्य आणि दिव्य होती. जवळजवळ लाख पेक्षा अधिक प्रेक्षक होते. काही मनोरंजनपर कार्यक्रम आयोजीत केले होते.
लेडीज स्टॅण्ड पण हाऊसफुल्ल होते. कुस्ती स्पर्धा बघायला खूप छान प्रतिसाद मिळाला, येथील माहोल..बघून आनंद झाला (नाहीतर नुसते क्रिकेट). या स्पर्धा सुंदर आयोजीत करण्यात आल्या आणि बाकी इतर उत्तम व्यवस्था याबाबत श्री मुरलीधर मोहोळ (माजी महापौर PMC) यांचे कौतुक आणि त्यांचे मनापासून आभार 🙏🙏 पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏








Comments
Post a Comment