३ जाने २०२३ - लेक चालली सासरला ..
श्रेयस आज पुणे - लखनौ आगगाडीने कानपूरचा परतीचा प्रवास - यासाठी पुणे स्टेशनवर आलो होतो. गाडीच्या बी-५ या बोगीजवळ आई-बाबा आणि मुले यांची गर्दी होती. बहुतेक ही मुले IIT कानपुर ची असावीत. मुलांचे प्रमाण जास्त एखादी दुसरीच मुलगी (का ...? ) दिसली.गाडी सुटायच्या ५ मिनिटे आधी सर्व आयांचे डोळे पाणावले. आपल्या संस्कृतीतील "माउली " ही खरच महान व्यक्ती असते. सर्वानी टाटा करून जड अंतःकरणाने निरोप घेतला आणि गाडीने सकाळी १०.४५ वाजता स्टेशन सोडले.
९ महिन्यानंतर माहेरी आलेल्या लेकाची खाणे-पिणे, अन्न पदार्थ यांची बडदास्त सौ वर्षांनी उत्तम सांभाळली. मंदिरास भेट, टेकडी फिरणे, इतर वस्तू खरेदी, इतर नातेवाईक यांच्या भेटी, गप्पा गोष्टी, या सगळीकडे सौ. वर्षाने श्रेयसला छान साथ दिली. प्रवासात खाणे पिणे यांचे डब्बे आणि इतर सूचना... पुण्यात आगमन ते परतीच्या प्रवासाची गाडी सुटेपर्यंत वर्षाने खूप काही केले.. याचे कौतुक करावे तेवढे कमीच.. "माउली" याचा अर्थ समाजाला. वर्षांनी आपल्या लेकासाठी केलेले कष्ट आणि त्याग याची किंमत करता येत नाही. अर्थात सगळ्याच "माउली" हे करतातच. निरोप समारंभ आणि स्टेशनवरील भावनिक वातावरण.. याबाबत मला लिहण्यासाठी माझ्या मनानी मला सांगितले म्हणून हे लेखन आणि आपणाशी शेयर करावे असे वाटले ... शुभम भवतु...





Comments
Post a Comment