पुस्तक वाचन 3

 







रूग्णानुबंध - ले. डॉ. दिलीप शिंदे. साधना प्रकाशन.







लेखक हे डॉक्टर.या पुस्तकात लेखकांनी फॅमिली डॉक्टर या नात्याने वैद्यकीय व्यवसायात आलेले कटू गोड अनुभव उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत.  सुरुवात मी डॉक्टर का  झालो आहे? याने होते. यातील सर्व लेख वाचनीय आहेत. यातील परमसखा मृत्यू? हा लेख मनास भावून गेला. आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात उद्भवणारे शारीरिक आणि मानसिक आजार - याबाबत डॉक्टर आणि पेशंट यांचा दृष्टिकोन..याचे अनुभव सुंदर शब्दात व्यक्त केले आहेत. डॉक्टर असून लेखनाची शैली छान. ज्यांना वैद्यकीय व्यवसायात काम करायचे आहे आणि जे हा व्यवसाय करत आहेत त्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. इतर वाचकांनी पण जरुर वाचावे. पुस्तक मला मनापासून आवडले. संग्रही ठेवावे असे.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा