श्रीशैल्यम

 



20 ते 22 डिसेंबर 2022 - पुणे ते श्रीशैल्यम ट्रीप - 12 ज्योतिर्लिंग पैकी  श्रीशैल्यम एक  - हैदराबाद येथुन गाडी करुन  श्रीशैल्यमला 20 संध्याकाळी पोचलो.  २१ डिसेंबर रोजी सकाळी दर्शन - धर्मदर्शन रांगेतून घेतले  बऱ्यापैकी गर्दी होती. ओम नमः शिवाय, नमो शंकरा या नामस्मरणात - गाभाऱ्यातील पिंडी पर्यंत कसे पोचलो कळले नाही  १ तासात दर्शन झाले.पाताळगंगा येथे रोपवे आणि बोट फेरी केली. पळसधारा आणि पंचधारा, शिखरम, साक्षी गणपती, छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र, श्री अक्कमहादेवी मंदिर, या ठिकाणी भेटी दिल्या. सर्व ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र हे प्रेक्षणीय 👌स्थळ आहे. आवर्जून पाहावे.श्रीशैल्य परिसर शांत आणि निसर्गाचे सौंदर्य, एक घाट उतरून दुसरा चढण आणि जंगल.. खूप रमणीय आहे. वाघ आणि इतर प्राणी काही दिसले नाही पण एक हरीण आणि चिल्ली पिल्ली वानर सेना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेली होती. बहूतेक पुणेकरांना भेटण्यास आली असावी🤣🤪










मुख्य देवळाजवळ आमचे हॉटेल होते.  दर्शनास जाताना मोबाईल काउंटर वर जमा करावा लागतो.  श्री अक्कमहादेवी गुफासाठी आगाऊ नोंदणी करणे जरुरीचे आहे. फक्त 50 seats. (प्रवास  ठिकाणं पाहणे यासाठी 5 तास लागतात या ठिकाणी खाद्य पदार्थ मिळत नाहीत) जमल्यास जरूर भेट द्या. आम्हाला भेट देणे जमले नाही.







आंध्र तेलंगणा येथे जेवणात भाताचे आणि भाज्यात तिखटाचे प्रमाण अधिक (अर्थात मी कमी तिखट खातो) असते. सिकंदराबाद रेल्वे स्टेशन स्वच्छ आणि सुंदर 👌आहे. 22 डिसेंबर रोजी रात्री शताब्दी एक्स्प्रेस गाडीने पुण्यास परतलो..





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा