मी काय वाचले - 20
"ब्लॅक अँड व्हाईट "- द्वारकानाथ संझगिरी
या पुस्तकात लेखकाने अशोककुमार, देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला, साधना, शम्मी कपूर.. या नट नट्या बाबत आपले विचार मांडले आहेत. प्यासा - गुरुदत्त - या चित्रपटाबाबत सविस्तर लेखन केले आहे. सपने मे मिलती है - यामध्ये अनेक गाजलेल्या नात्याचे अभिनयाबाबत विचार उत्तम मांडले आहेत. मीनाकुमारी बाबतची ट्रॅजेडी, चांद फिर निकला या गाण्याबाबत, वन मन इंडस्ट्री - राज कपूर-- सुंदर लिहिले आहे. द्वारकानाथ संझगिरी यांचे क्रिकेटबाबत लिखाण वाचले होते. पण चित्रपटाबाबत प्रथमच वाचले. काही नटाबाबत भेटून मुलाखती घेतल्या आहेत. त्यांची विनोदी शैली जास्त भावून जाते. पुस्तक वाचायला हवे.


Comments
Post a Comment