पर्णकुटी homestay
Alumni meet साठी आम्ही शनिवारी रात्री इचलकरंजी येथे मुक्काम केला होता. शुभम डायनिंग येथे जेवण झाल्यावर दीपकने "पर्णकुटी homestay" येथे राहण्याच्या व्यवस्था केली होती. पर्णकुटी म्हणजे अगदी घरगुती.. येथील निवास व्यवस्था, रुंममधील सोयी, चहापान, रूम पुढे विविध प्रकारची झाडी, कुंड्या, वेली.. झोपाळा...सकाळी अभंग, आरती, नामस्मरण.. चहा घेत ऐकायला मिळाले. एकूण येथील मुक्काम वातावरण.. मनास आनंद झाला. प्रत्येक घरगुती कुटुंबीयांनी जरूर लाभ घ्यावा.
सकाळी 8.30 वाजता- चिकोडी येथे जाण्यासाठी दीपक आणि सौ वैभवी वहिनी गाडी घेऊन हजर... गप्पा मारत चिकोडी BK college कधी आले कळले नाही. Alumni meet कार्यक्रम उत्तम पार पडला. संध्याकाळी साडेपाच वाजता कॉलेज वरून चीदु आणि उज्ज्वला यांच्या घरी धावती भेट दिली. गाडीत आणि बाहेर वर्षा 🌧️होतीच.. शिरगाव येथील श्री बसवेश्वर मंदिरास जाता जाता भेट दिली. हे एक जागृत देवस्थान आहे. शंकराची पिंड.. मंदिराचा आवर प्रशस्त आहे.. मंदिर खूप छान 👌आहे.. रात्री दहाच्या संजय ट्रॅव्हल बसने पुण्यास परतीचा प्रवास...
सदैव busy असणाऱ्या दीपक आणि सौ वैभवी वहिनी यांनी आमची पुणे ते पुणे - प्रवास, मुक्काम, भोजन आणि इतर व्यवस्था उत्तम👌 केली. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच... दोघांचा सबंध दिवस आम्हाला सहवास लाभला आम्ही खरचं भाग्यवान.. दोघांना मनापासून धन्यवाद..🙏🙏 आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न...




Comments
Post a Comment