ज्योती कलश" - देहबोलीतून कवितेशी संवाद

 






कर्नल्स क्यूब संस्थेने "ज्योती कलश" -  देहबोलीतून  कवितेशी संवाद  - असा काव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. ज्योती ढमढेरे  आणि डॉ. अवनी दमदार -  आजी आणि नातीने हा कार्यक्रम सादर केला.  देहबोलीतून कविता जास्त भावते असे विचार डॉ. ज्योती यांनी व्यक्त केले. गणेश वंदना नंतर गवळण, लावणी आणि हिंदी स्वरचित कविता सादर केल्या.  डॉ अवनी ढमढेरे यांनी आपल्या सुरेल स्वरात काही कविता सादर करून साथ दिली.  कविता सादरी करणावेळी डॉक्टर ज्योती यांनी देह बोलीतून  हावभाव सादर करीत कवितेशी संवाद साधला.   राया कसा करू शिंगार या लावणीस महाराष्ट्र साहित्य पहिले बक्षीस मिळाले. बक्षीस कार्यक्रमादरम्यान या लावणीवर  मधू कांबीकर यांनी नृत्य केले या आठवणी डॉ. ज्योती  यांनी जागवल्या.  रंगाच्या  लावणीबाबत बाजीराव पेशवे यांच्यावर केलेली केसरी रंगाची लावणी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. गाण्याचे पैलू आणि लावणी याचे विशेष कौतुक करत डॉ. ज्योती रॉक म्युझिक मध्ये लावणी सादर करतील  अशी आशा व्यक्त करीत  कर्नल फुले यांनी  आभार प्रदर्शन केले. डॉक्टर मंदार परांजपे यांनी डॉक्टर ज्योती त्यांनी वयाची 82 नुकतीच पार केली असे नमूद केले. त्यांनी डॉक्टर ज्योती यांच्या कविता आणि कायाकल्प याबाबत चारोळी सादर करून डॉक्टर ज्योती  यांचे विशेष कौतुक केले.  ज्योती कलश या कवितेने 2025 मधील कार्यक्रमाची अखेरची सांगता झाली. साऱ्या रसिकांनी कवितेस आणि लावणीस  उत्तम दाद दिली. डॉ. ज्योती यांची कविता आणि संगीत यांची ज्योत ढमढेरे कुटुंबीयच्या साथीने अखंड तेवत राहो हीच मनोकामना कर्नल क्यूब संस्थेच्या वतीने. संस्थेच्या साऱ्या सभासद आणि हितचिंतक मंडळींना भावी 2026  सालाबाबत हार्दिक शुभेच्छा.. या अनोख्या कार्यक्रमाबाबत कर्नल्स क्यूब संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद . चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी.  २७.१२.२०२५. 





Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा