शास्त्रीय गायन बैठक

 





१७ जानेवारी २०२६ - श्रीकृपा हॉस्पिटल पिरंगुट आणि बिजनेस कंपास यांनी अखिलेश कुलकर्णी आणि डॉ. सौ. रेवा नातू यांची शास्त्रीय गायन बैठक - कार्यक्रम सहकार सदन भारतीय निवास को-ऑपरेटिव्ह सोसायटी सभागृहामध्ये आयोजित केला होता.  प्रारंभी अखिलेशने भीमपलास राग सादर केला त्यानंतर "आली कुठून अशी कानी" हा अभंग गायला. अखिलेश हा डॉ. सौ. रेवा नातू यांचा शिष्य. डॉक्टर सौ. रेवा नातू यांनी यमन रागातील बंदिशी आणि  द्रुतबंदीशी सादर केल्या. आपला शिष्य अखिलेश याची शास्त्रीय  गायनाची प्रगती आणि सादरीकरण याबाबत कौतुक उद्गार काढले. विशेषता: अखिलेशचा प्रामाणिकपणा त्याचा  रियाजाबाबत कष्ट  यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. अखिलेशला गायनाबाबत  प्रोत्साहन याकामी त्याच्या आई बाबा आजी आजोबा आणि इतर नातलग, हितचिंतक यांचे आभार मानले. या बैठकीस संवादिनी, तबला आणि तंबोरा यांची उत्तम साथ लाभली. कार्यक्रमाची सांगता "निघालो घेऊन दत्ताची पालखी"  या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे निवेदन श्री नरहर गोसावी यांनी केले. डॉक्टर आशुतोष कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. सभागृहातील रसिकांनी या श्रवणीय गायनास भरभरून दाद  देत आशुतोषचे आणि त्याच्या गुरु डॉ.सौ. रेवाताई यांचे कौतुक केले. सर्वानी अखिलेशच्या आई-वडिलांचे आभार मानले. अखिलेशच्या गायनच्या प्रगतीबाबत विशेषता: त्याच्या आईने घेतलेले कष्ट आणि प्रोत्साहन याचे कौतुक करावे  तितके कमीच .. अखिलेशच्या गायन आणि वादन यांची पालखी सदैव झुलत राहो... आणि त्या सोहळ्यास हजर राहण्याचा लाभ मिळो हीच श्री दत्तगुरु चरणी प्रार्थना. 🙏🏻शुभम भवतु... धन्यवाद.. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा