श्री व सौ भाटे यांच्या पंचाहत्तर आणि सत्तरी वाढदिवस

 


                                         श्री व सौ भाटे यांच्या पंचाहत्तर आणि सत्तरी वाढदिवस 


श्री भाटे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. एकमेकांच्या घरगुती समारंभात एकमेकांच्या मदतीचा सहभाग नेहमी असतोच. अनिल भाटे माझ्या ज्येष्ठ बंधूंचा ऑफिस मित्र नंतर माझी ओळख पुण्यात असताना घडवून आमची मैत्री झाली. बॅचलर लाईफ मध्ये पुण्यात असताना आमच्या गाठीभेटी चहापान, जेवणावळी, फिरणे वगैरे वरचेवर घडत असे. त्याच्या रूमवर त्याचे आई-बाबा आले असताना अनिलचा मुक्काम करण्याचा आग्रह असे तेव्हाच त्याच्या आई-बाबांची ओळख झाली. प्रत्येक वेळी घरी गेल्यावर आई आम्हास  चहा, जेवण इतर पदार्थ करून घालत. एक तीळ सात जणांत वाटून खावा.. या म्हणीप्रमाणे आई आम्हास खाऊ देत. या वयात स्वयंपाक पाणी करताना बघून मला नेहमी संकोच वाटे पण त्यांच्याबद्दल कौतुक वाटे आणि त्या आपल्या लेकराप्रमाणे आम्हा भावंडांची विचारपूस करीत.  त्या नेहमी काळजी पण करत अर्थात त्यांचा स्वभाव थोडा काळजी करण्याचा आहेच म्हणा..


अनिलचे बाबा शिस्तप्रिय स्वतःच्या तब्येतीस सांभाळून राहत. राहणीमानावर सरकारी नोकरीचा छाप असे. कधी कधी अनिल चेष्टेने मला म्हणे आमचे बाबा म्हणजे टिपिकल गव्हर्नमेंट सरवंट.. वगैरे बाबांच्या शिस्तीबद्दल माझी आई आम्हास सांगत असे. मध्यंतरी माझी आई व इतर मंडळी सातारा येथे भाटेंच्या घरी गेली होती. सर्व मंडळी दारात चपला बूट काढून घरात जाऊन गप्पा मारू लागले. लगेच बाबांनी सर्वांच्या चपला एकमेकाशी जुळवून व्यवस्थित लाईन मध्ये एका बाजूस ठेवल्या.. एका चप्पलच्या दुकानाच्या शोकेसमध्ये ज्याप्रमाणे चपला व्यवस्थित मांडून ठेवतात त्याप्रमाणे त्यांनी पादत्राणे ठेवली होती.. नाहीतर आपला मुलगा मुलगी शाळेतून आल्यावर एक बूट एका दिशेस तर दुसरा दुसऱ्या दिवशीच असतो. बाबांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. वाचन  दररोज करून वर्तमान घटना घडामोडी व त्यांच्याशी चर्चा चाले.  त्यांचे जेवणखाणे प्रमाणात असे. उतारवयात  बीपी अगर डायबिटीस या मित्रांची साथसंगत त्यांना लाभली नाही. काही दिवसापूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर मात्र ते कोमा अवस्थेत गेले होते.  पण सुदैवाने त्यातून लवकरच बरे झाले. खरंच त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे बाबांना 75 वर्षे देवाने मोठा बोनस दिला आहे. हा बोनस बाबांना शतकपूर्तीपर्यंत पुरून उरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...


अनिल चे बाबा शिस्तप्रिय स्वतःच्या तब्येतीस सांभाळून राहत राहणीमानावर सरकारी नोकरीचा छाप असे कधी कधी अनिल चेष्टेने मला म्हणे आमचे बाबा म्हणजे टिपिकल गव्हर्नमेंट सरवंट वगैरे बाबांच्या शिस्तीबद्दल माझी आई आम्हास सांगत असे मध्यंतरी माझी आई व इतर मंडळी सातारा येथे भाटेंच्या घरी गेली होती. सर्व मंडळी दारात चपला बोट काढून घरात जाऊन गप्पा मारू लागले लगेच बाबांनी सर्वांच्या चपला एकमेकाशी जुळवून व्यवस्थित लाईन मध्ये एका बाजूस ठेवल्या एका चप्पलच्या दुकानाच्या शोकेसमध्ये ज्याप्रमाणे चपला व्यवस्थित मांडून ठेवतात त्याप्रमाणे त्यांनी पादत राहणे ठेवली होती नाहीतर आपला मुलगा मुलगी शाळेतून आल्यावर एक बूट एका दिशेस चा दुसरा दुसऱ्या दिवशीच असतो


आज आपल्या जीवनात - बाबानी  ७५ आणि आईने  ७० पार केली आहे.  माणसाला वयाला सत्तर वर्ष पूर्ण होणे आणि त्याचा सत्कार समारंभ होऊन मानसन्मान घडून येणे हे थोड्याच माता-पितांच्या नशीब असते नाही का ?देवाची कृपा कर्तबगार मुले, पैसा व हाऊस वगैरे बाबी शिवाय असे समारंभ यशस्वी पार पडू शकत नाही. अशा समारंभास हजर राहणे हे मी भाग्याचे  समजतो. हा समारंभ घडवून आणण्याबाबत भाटे कुटुंबियांनी बरेच कष्ट घेतले आहेत विशेषतः समारंभ विशेष पार पाडण्यात कर्तबगार अनिल भाटे यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. यात शंका नाही मी मनापासून त्याचा आभार मानून धन्यवाद देतो.  चाणक्य मुंजी आधी केळवण प्रसंगी औक्षण करताना माझ्या पत्नीने कानडी गाणे म्हटले होते. ते गाणे अनिल आणि बाबांना पण आवडले म्हणून वाढदिवसाच्या जरूर हजर राहावे असे त्याने माझ्या पत्नीस  बजावले होते.  पण माझी पत्नी सध्या प्रिव्हिलेज लिव्हवर सुट्टीसाठी माहेरी गेली आहे. पत्नीच्या स्वरांची उणीव शब्दांनी भरून काढावी असे मनात ठरवले म्हणून हा प्रपंच...


भावी आयुष्यात आई बाबांना सुआरोग्य, सुखसमाधान भरपूर मिळो आणि जीवन आनंदमयी राहो हीच प्रार्थना.. आयुष्याच्या आणि व्यक्त करतो वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सहभोजनाच्या आमंत्रणपत्रके शेवटी टीप आहे.. कृपया आहेर अथवा पुष्पगुछ आणू नये पण मी हार्दिक शुभेच्छांचा शब्दांचा पुष्पगुच्छ कुलकर्णीकुटुंबतर्फे तसेच उपस्थित सर्व हितचिंकांच्यावतीने  आई-बाबांना सादर करतो.. जीवेत शरदः शतम.. धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा