प्रार्थनेतील शक्ती
१५ डिसेंबर - लोणी काळभोर येथील डोम पाहण्याचे ठरवले. सकाळी PMT बसमध्ये चाळीस रुपयाचा एक दिवसाचा पास काढून हडपसर येथे गेलो. तिथे उरळीची बस पकडून लोणी गावात विश्वराज हॉस्पिटल येथे उतरून काही अंतर चालून डोम या ठिकाणी पोचलो. तिथे आधी दर्शन पास घ्यावा लागतो. पासचे रु १०० . गेटवर रखवालदारास डोमचा पास दाखवला आणि डोमकडे वाटचाल केली डोमच्या वास्तूच्या पायऱ्यांवर काही सुंदर सुविचार कोरलेले आहेत. गोलघुमट सारख्या डोमच्या इमारतीत साऱ्या धर्माच्या संत आणि गुरु यांचे पुतळे आणि माहिती यांचे दर्शन होते. जगातील सर्वात मोठा डोम म्हणून हा प्रसिद्ध आहे. या भव्य इमारतीत आपला आवाज घुमतो. इथे मी खिश्यात हात घालून बघितले तर माझा PMT पास गायब. मी इतर खिश्यात शोधू लागलो तर मला पास मिळाला नाही. गेटपाशी बहुतेक खिश्यातुन पडला असावा असे वाटले. - गेटपाशी जिथे पास पडला असेल तिथेच पास असू दे .. मी या शांती हॉलमध्ये देवाकडे प्रार्थना केली. एक मन म्हणत होते - वाऱ्याने पास उडून गेला असेल का...? स्वच्छता कर्मचारी झाडू मारून तो कदाचित कचऱ्याच्या पेटीत गेला असेल का.. असे तर्कवितर्क मनात आले. पण मी देवावर विश्वास ठेवून.. शांती हॉलमध्ये थोडावेळ शांत बसून ध्यान केले. देवावर भार टाकून पुढे इतर गोष्टींचा आनंद घेण्याचे ठरवले.
डोममधून खाली ग्रंथालय आहे. ग्रंथालयाच्या बाहेर भिंतीवर प्रसिद्ध शाश्त्रज्ञ, समाजसुधारक, शूरवीर गाजलेल्या व्यक्तीचे फोटो आणि माहिती कोरली आहे. ग्रंथालयाचा परिसर मोठा आहे. इथे साऱ्या धर्माच्या महत्वाची पुस्तके, ग्रंथ वाचायला ठेवले आहेत. मध्यभागी संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा ठेवून तुम्ही इथे ध्यान करण्यासाठी बसू शकता. या ग्रंथालयात १०८ खांब आहेत. डोमच्या चारी बाजूस चार टॉवर्स आहेत. हे म्हणजे चार वेद, जप माळेतील १०८ मणी.. या धार्मिक विचाराच्या धर्तीवर इमारतीचे बांधकाम..
पुढे गीता मंदिरास भेट दिली त्या वास्तूच्या आधी पाच पांडवांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. इमारतीत भगवद्गीतेतील अर्जुन आणि कृष्णा आणि घोड्याचे सारथी याची प्रतिकृती सुंदर बनवलेली आहे. हॉलमध्ये गीतेतील काही श्लोक कोरले आहेत. आजूबाजूस फुलांची झाडे, गवताळ भाग सुंदर रमणीय आहेत.





.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment