मी काय वाचले -१३ - अबोलीची भाषा - प्रतिभा रानडे

 








विविध दिवाळी अंकांतील लेखिकेने लिहिलेले लेखांचे संकलन म्हणजे हे पुस्तक.  आपल्या जीवनात भेटलेल्या व्यक्ती, घटना आणि अनुभव यांचे उत्तम चित्रण या पुस्तकातील लेखात व्यक्त केले आहे. विदुषी दुर्गाबाई यांचे व्यक्ती चित्रण आणि  स्वभाव - स्मरण दुर्गाबाईंचे या लेखात उत्तमप्रकारे लिहिले आहे. आपल्या आई,आजी, मावशी, आणि इतर नातलग यांच्याबाबत आठवणी - अबोलीची भाषा या लेखात आहेत. अश्वस्थाच्या सावलीत या लेखात आपल्या वडिलांच्याबाबत कर्तृत्वाबाबत सुंदर आठवणी लिहल्या आहेत. हा लेख मनास भावून जातो.  आपल्या आईची ज्ञानेश्वरीविषयी भक्ती - आळंदी या लेखात कथन केली आहे.  पावसाच्या आठवणी आणि निसर्ग याबाबत अनुभव आपल्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात.  सर्व लेख वाचनीय आहेत. हे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे 👌👍आहे.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा