मी काय वाचले -15 -ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी - ले. प्रतिभा रानडे
ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी - ले. प्रतिभा रानडे
या पुस्तकात लेखिकेने दुर्गाबाईंना बरेच प्रश्न विचारले आणि त्यावर दुर्गाबाईंचे विचार.. प्रामुख्याने ५ विषयावर हे पुस्तक विभागले आहे - १) संस्कृती २) साहित्य चिंतन ३) बौद्धांचे योगदान ४) दुर्गाबाईंच्या लेखन प्रवास आणि ५) मृत्यू .. अनेक समाजातील रूढी परंपरा, बौद्ध धर्म, साहित्य आणि मृत्यू याबाबत विषयवार लेखिकेने विचारलेल्या प्रश्नावर दुर्गाबाईंनी परखड विचार मांडले आहेत. दुर्गाबाईंच्या वृत्तीमध्ये नित्य ताजेपणा, ज्ञानाची पराकोटीची ओढ .. हे रहस्य सुखी जीवनाचे.. रोजचा दिवस नवी उमेद देऊन जातो ..आपले आयुष्य म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे .. असे विचार दुर्गाबाईंचे आहेत असे लेखिका म्हणते. पुस्तक वाचनीय आहे. या पुस्तकास मराठवाडा साहित्य परिषद यांचा पुरस्कार लाभला आहे.







Comments
Post a Comment