गगनबावडा - गेट टू गेदर - सकाळी फेरफटका

 







उज्जवलानी गगनबावडा get-to -gether चे विस्तृत आणि सुंदर मनोगत लिहिले आहे. माझे मनोगत लिखाणाचा भार बराच कमी केला याबाबत आणि तत्पर लिखाणाबाबत धन्यवाद..मी अधिक काय लिहणार म्हणा.. परत मनापासून धन्यवाद...

गगनबावडा -गेट टू गेदर - विविध खेळ आणि भेट आदान-प्रदान कार्यक्रमाच्या सुरुवातीस - भारताने चांद्रयान -३  हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवले. या कामगिरीबाबत ISRO च्या चांद्रयान मोहिमेतील साऱ्या शास्त्रज्ञांचे आभार आणि कौतुक केले.  तसेच आपला मित्र दीपक हा इचलकरंजी रोटरीचा अध्यक्ष झाला. रोटरीच्या कामामुळे गेट टू गेदरला उपस्थित राहू शकला नाही. या दिपकच्या कामगिरीबाबत सन्मान म्हणून सर्वानी उभे राहून टाळ्या वाजवून गौरव केला.  या दोन्ही गोष्टी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहेत.  आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचतात असे मला वाटते. आपले ग्रुपचे सुधारित बॅनर खूप छान झाले आहे. बँनरसाठी उज्ज्वलाला धन्यवाद...

गगनबावडा - गेट टू गेदर - सकाळी फेरफटका -

रविवार २७ ऑगस्ट - सकाळी साडेसहा वाजता सगळ्यांनी फिरायला जायचे असे आदले दिवशी ठरवले. सकाळी सहा दरम्यान "वर्षां" नी आम्हाला रुममध्येच थांबवून ठेवले.  सात वाजता पाऊस थांबल्यावर सगळ्यांनी एकत्र हॉटेलच्या गेटपासून चालण्यास सुरवात केली.  रस्त्यावर अजिबात रहदारी नाही आणि गवे आले तर -   आम्ही पुढे आहोत असे "अभय" अभयने दिले. तेव्हा त्याच्या साथीस असण्याऱ्या "संजय"  यांच्या मागून आम्ही गप्पा मारीत चालू लागलो.  आजूबाजूस गर्द झाडी, शांत वातावरण, नुकताच पाऊस पडून गेला होता. आधेमध्ये धुक्यांचे ढग..समोरून म्हशी आणि वासरे येत होती.  

काही अंतर चालून गेल्यावर मी मागे परतलो.  सोबत एक गुराखी आणि काही म्हशी आणि वासरे चाललेली होती. गुरख्यावर गाव आणि इतर गप्पा चालू झाल्या. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता. बरोबर म्हशी होत्याच. तीन म्हशींच्या गळ्यात तीन घंटा होत्या. तिनी घंटेचा आवाज, नाद वेगवेगळ्या प्रकारचा होता. तीन विविध प्रकारच्या नादाची - "वीणा" झंकारत होती. शांत वातावरणात हे लयबद्ध "संगीता "ची गोडी अवीट होती.  ऐकायला बरे वाटले. बिचाऱ्या त्याना तर कोण कंपनी देणार...? (माझ्या साऱ्या लाडक्या मैत्रिणींनो क्षमस्व....)   या "अरुणा" समयी मला हे भाग्य लाभले. या सगळ्या गोष्टी मनास "आल्हाद"दायी होत्या.  या "मंगल" मयी फेरफटक्यात "नितीन आणि नरेंद्र" याची साथ होती.   असा निसर्गाच्या सानिध्यातील सकाळचा फेरफटक्याच्या "ज्योती" प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहोत याच "उज्ज्वल" आणि "स्नेह" मयी शुभकामना  गेट टू गेदर वेळी सकाळचा फेरफटका -  रमत गंमत, रमणीय निसर्ग आणि मित्र मैत्रिणींच्या सहवासात मनास सुखकर होता. मला वाटते हाच आगळा वेगळा अनुभव आपणास पण आला असणार नाही का ....






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा