मी काय वाचले -13
"प्रिय बाबुअण्णास" - नंदा पैठणकर
नंदा पैठणकर या जी,ए. कुलकर्णी यांच्या मावस बहीण ... जी ए यांनी आपल्या दोन मावस बहिणी - प्रभावती आणि नंदा यांचा लहानपणापासून सांभाळ केला. आपले गाव बेळगाव, धारवाड येथील शाळा कॉलेज -शिक्षण आणि जीवन - या काळातील साऱ्या आठवणी जागवल्या आहेत. जी. ए यांच्या स्वभाव, कॉलेजमधील प्रोफेसर नोकरी आणि साहित्य लेखन याबाबत आठवणी, प्रसंग यांचा उल्लेख उत्तम प्रकारे व्यक्त केला आहे.साधी राहणी, त्यागी वृत्ती आणि उच्च विचारसरणी, आपल्या कामाचा कोठेच गाजावाजा न करणे.. असे अनेक गुणांचे दर्शन पुस्तकातून लेखिकेने वर्णन केले आहेत. त्यांचा पत्रसंवाद हा आवडता उद्योग - पत्र लेखन हा विस्तृत आणि सुंदर आहेत. माझे गाव चिकोडी (जिल्हा - बेळगाव) यामुळे आणि पत्रलेखन ... यामुळे हे पुस्तक मला अधिक भावून गेले. बाकी जी ए लेखन उत्तम.. त्यांची काही पुस्तके माझ्या घरी आहेत. पुस्तक वाचनीय आहे.





Comments
Post a Comment