"शुभम बंगलो" - गृह प्रवेश सोहळा कार्यक्रम

 










२ फेब्रुवारी - आज आपला गृह प्रवेश सोहळा कार्यक्रम .. हार्दिक शुभेच्छा..


आपले छोटेसे रोपटे आता वृक्षात रूपांतरित झाले याचा आनंद आहे. आई-वडील आणि कुटुंबीय, सारे हितचिंतक यांचे आशीर्वाद या पाठबळाचा भक्कम पाया असलेला "शुभम बंगलो" सुंदर असणार यात शंका नाही. आपला वास्तू-शांती कार्यक्रम भव्य आणि दिव्य असणारच.  आपला कोणताही प्रकल्प हा नेहमीच नेत्रदीपक असतोच याचा अनुभव आम्ही आमच्या पहिल्या गेट टू गेदर - पन्हाळा येथे नेत्रांनी घेतला आहे. "शुभम बंगलो" - ही वास्तू नेत्रदीपक असणारच रोपट्याचे वृक्षात रूपांतरित करण्यात आपल्या कुटुंबियांचे अविरत कष्ट आणि मेहनत आहे. आपल्या कुटुंबियांचे कौतुक आणि अभिनंदन. या कामी सौ वैभवी वाहिनी यांचे कौतुक करावे तितके कमीच. त्यांची कामगिरी अभिमानास्पद आहे.


घरगुती कारणामुळे आम्ही आपल्या वास्तू शांती कार्यक्रमास हजर राहू शकत नाही क्षमस्व.आपल्या नव्या वास्तूत आपण सर्वाना सुख शांती आणि समाधान लाभो.  आपल्या कुटुंबीयांची सदैव्य भरभराट हो हीच वास्तुदेवतेस मनापासून आपल्या साऱ्या RDHS ग्रुपच्या वतीने.प्रत्यक्ष हजर राहता येत नाही म्हणून हा शब्दरूपी शुभेच्छांचा छोटेशी भेट...शुभम भवतु


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा