अस्वस्थ स्वात्रंत्र्य
२५ फेब्रुवारी २०२३ - कर्नल्स क्यूब यांच्या वतीने " अस्वस्थ स्वात्रंत्र्य " - हा कार्यक्रम आयोजित केला होता. मैत्री ग्रुप पुणे यांनी सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यंकटेश माडगूळकर यांची "पिंजरा" या कथेचे वाचन सादर केले गेले. कथा वाचन आणि सादरीकरण मस्त. विशेषतः - कथेतील "गोप्या " सुतार याची भूमिका खूप छान होती .
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अस्वस्थ शतकाची कविता यात कवी श्री वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांचे अभिवाचन मैत्री ग्रुप यांनी सादर केले. स्मृतीभंश काळात, विचार झाला पाहिजे, निवड, नकार, पत्र, वाचकांचा पत्रव्यवहार, वास्तव, वाट, खेळ, अमिताभ बच्चन, वास्तववाद, मुले हसताहेत,पात, उंदीर मारण्याचे औषध, यंत्रणा, प्रश्न या कविता वाचन झाले. या सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, धार्मिक ... विषयावरील वास्तव आणि सामान्य माणसाच्या भावना यांचे चित्रण सुंदर शब्दात केले गेले. प्रत्येक कवितावाचन वेळी पडद्यावर कवितेशी साजेसे चित्र आणि गाणे दाखवले गेले. यातील शेवटची "प्रश्न" या कवितेस रसिकांनी उत्तम दाद दिली. यामध्ये सामान्य माणसास पडणारे प्रश्न - यावेळी काय करावे, प्रश्न डोके भंडावून सोडणे, कोणते प्रश्न विचाराचे नाहीत...वगैरे आशय होता. आता तुम्हीपण मला कृपया कार्यक्रमाबत अधिक "प्रश्न" विचारून नका... कार्यक्रमाचे नाव वाचल्यावर मी काय कार्यक्रम असणार थोडा अस्वस्थ होतो आणि मलापण प्रश्न पडला होता. पण मैत्री ग्रुपच्या श्री समीर इनामदार आणि साऱ्या कलाकारांनी यांचे उत्तर दिले. उत्तम अभिवाचन. चित्र, ध्वनी योजना .. सादर करून रसिकांचे छान मनोरंजन केले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबाबत कर्नल क्यूब संस्थेचे आभार आणि धन्यवाद.


Comments
Post a Comment