ती. आप्पाजी वर्षश्राद्ध कार्यक्रम

 








1 आणि 2 फेब्रुवारी रोजी ती. आप्पाजी वर्षश्राद्ध कार्यक्रम व्यवस्थीत पार पडला. विधी छान पार पडले. भोजनातील सर्वच पदार्थ चविष्ट झाले होते. आचारी यांनी व्यवस्थीत वाढले. संध्याकाळी संगीत मैफील कार्यक्रमात गायकांनी आपली कला सादर केली. राजगोळी बाबत कविता वाचन झाले. संगीत,वादनाची सांगता..श्री राम जय राम जय राम.. यांनी झाली.ग्रूप फोटो काढले. रसिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मैफील ची शोभा वाढवली. कार्यक्रमासाठी राजगोळी इनामदार मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ही सारी ती. आप्पाजीची आपुलकी आणि प्रेम यांची पावती नाही का...? आपल्या आयुष्यात ती आप्पाजी यांनी आपल्या स्वभावामुळे सर्वांचे प्रेम आणि स्नेह यांची भरपूर Fixed Deposit जमा केली हे अनुभवले. दोन दिवसात सगळ्यांनी ती. आप्पाजी यांच्या आठवणी जाग्या केल्या. सर्वांची उपस्थिती, आनंदी सहभाग...हे पाहून ती. आप्पाजी यांना समाधान आणि आनंद झाला असता. अर्थात् आकाशातून याचा आनंद लुटला असेलच. त्यांच्या आशिर्वाद आणि कृपा यामुळे सर्व कार्यक्रम उत्तम पार पडले. यात शंका नाही..


अंदाजे 40 नातेवाईक यांची नाश्ता चहा पाणी,भोजन आणि मुक्काम यांची सारी व्यवस्था आपल्या घरी सौ. गायत्री आणि विश्वास यांनी उत्तम केली होती. दोघांचे कौतुक करावे तितके कमीच...ती. आप्पाजी यांना मनापासून विनम्र अभिवादन आणि साष्टांग नमस्कार 🙏🙏 ओम शांती 🙏🙏




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा