सेवाव्रती गायत्री

 



माझ्या सासू आणि सासरेबुवा यांच्या  भेटीसाठी बेंगलोर येथे गेल्या आठवड्यात 8 दिवसाचा दौरा करुन आलो. सासुरवाडीस जाऊन जवळजवळ 3 वर्षे झाली होती.  वयोमानानुसार खाणे कमी झाल्यामुळे आणि इतर पथ्य पाणी यामुळे तब्येतीत चढ उतार असतो. आपल्या सासू-सासरे यांच्या तब्येतीची काळजी सौ. गायत्री उत्तम घेते.  त्यांचे पथ्य पाणी, औषध, इतर किरकोळ आरोग्याच्या चाचण्या घेणे, नियमित खान-पान, हे सर्व गायत्री आनंदाने करते.  आमच्या ८ दिवस मुक्कामात गायत्रीने आम्हास उत्तम स्वयंपाक पाणी करून वाढले.  सर्व अन्नपदार्थ चविष्ट केले होते. गायत्री दोन चाकी आणि चार चाकी गाड्या उत्तम चालवते.   तिच्यामुळे आम्हाला काही भागातील देवळास गाडीतून भेटी देता आल्या.  आपल्या मुलीस नृत्याच्या क्लास साठी खूप मेहनत घेऊन पाठबळ देते. शाळेमध्ये Co-ordinator पदावर काम करून आपल्या कुटुंबियांसाठी बरीच मेहनत घेऊन घरासाठी झटत असते. तिच्या Co-ordination या कौशल्यामुळे जीवनात तिचे सर्वाशी छान co-ordination जमते .जुन्या आणि नवीन पिढीच्या विचारसरणीशी मिळतेजुळते घेऊन आनंदाने चटकन समरस होते. ..अशी  सून  मिळणे म्हणजे ..श्री इनामदार कुटुंब खरंच नशीबवान...  अशी प्रेमळ आणि सेवावृत्ती सून लाभणे म्हणजे आपल्या वृद्धापकाळात जणू स्वर्गसुखच .. नाही का....? बेंगलोर मुक्कामात तिचे आदरतिथ्य आम्ही अनुभवले.  वयाची पन्नाशी गाठल्यावर अशी गृहकर्तव्यदक्ष सून मिळावी यासारखे डोहाळे लागणे हे साहजिक नाही का ...?असो ..गायत्रीचे कौतुक करावे तितके थोडकेच.. कर्तव्याने घडतो माणूस...हे गाणे गायत्री बाबत सार्थ आहे. उत्तम स्वयंपाकपाणी, आदरातिथ्य, सेवाभाव..या अंगी वसलेल्या आपल्या आईच्या गुणाचा वारसा गायत्री ने पुढे चालवला आहे. याचा मी साक्षीदार आहे. आज ती. रमेश मामा (गायत्रीचे वडील) हवे होते त्यांना हे वाचून अभिमान आणि आनंद झाला असता.  असो तरीपण ते स्वर्गातून आशीर्वाद आणि शक्ती - पाठबळ, आनंदाने कौतुकाचा वर्षाव नक्कीच गायत्रीवर करीत असणार यात शंका नाही... काय योगायोग आमच्या मुक्कामात रोज संततधार पाऊस पडत होता ..निसर्गाने सुद्धा याची पावती दिली.. गायत्रीस भरपूर शक्ती मिळून भावी जीवन सुखसमाधानाचे आनंदमयी राहो हीच   देवी  श्रीतुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना..🙏 जे अनुभवले ते व्यक्त केले आणि कामाबाबत कौतुकाची थाप यासाठीच हे कृतज्ञतेचे दोन शब्द.. अश्या गोष्टी जीवनात अनुभवायला मिळणे ..ही सारी भगवंताची कृपा असते नाही का .... हे सर्व त्यालाच अर्पण...🙏🙏 चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी 20.10.2021

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा