गांधी आणि शास्त्री जयंती

 


माध्यमिक शालेय जीवनात गांधींची भेट झाली ती निबंधावेळी.  त्यावेळी एवढेच माहित की गांधींच्याविषयी बऱ्या पैकी माहिती होती ८-१० ओळी लिहिता येत असे.  म्हणून माझा आवडता नेता या विषयावर भाषणासाठी अर्थात गांधींची निवड केली जात असे.  नाहीतर दुसरा नेता निवडलातर दोन तीन मिनिटानानंतर  भाषणात ..अ..अ ..ची पाळी यायची.  तरुण वयात आम्ही गांधी यांना नावे ठेऊन टिंगल करीत असू .  बँकेच्या नोकरीत बदली अहमदाबाद येथे झाली. त्यावेळी साबरमती आश्रमास भेट दिली.  पोरबंदर येथे गांधींचे जन्म स्थळ पाहण्याचा योग आला.   

प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या भाषणात " गांधी " यांचा उल्लेख नेहमीच असायचा.  वाचनात गांधी यांच्याबाबत काही माहिती आणि इतर गोष्टी कळल्या.  नोकरी आणि इतर प्रांतात राहताना, प्रवास करताना गांधी यांची तत्वे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि मला फायदा झाला.  अहिंसा, सत्य, साधी राहणी उच्च विचारसरणी , गरीबांविषयी करुणा, स्वच्छता, आरोग्य, खानपान , प्रार्थना, सात तत्वे., ... याबाबतचे विचार भावून गेले.  विसाव्या शतकातील दोन महान व्यक्ती मध्ये "गांधी" आणि "ओशो" यांची निवड केली आहे.  या दोन्ही व्यक्ती आदरणीय आहेत.  माझे जीवन हाच महान संदेश आहे -  असे गांधीजी म्हणत.  हे खरे आहे.


लाल बहादूर शास्त्री यांचे किसान आणि जवान यांच्याबाबत करुणा .. जय जवान आणि जय किसान .. भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी पदाचा गैरवापर आपल्या कुटुंबियांसाठी कधीच  केला नाही.  त्यांची निस्पृह  देशसेवा, त्यागी वृत्ती, साधेपणा, वाखाणण्याजोगा आहे.  दोन्ही महान आत्मास मनापासून त्रिवार वंदन .. ०२ ऑक्टोबर २०२१.




गांधीभवन कोथरूड पुणे 


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा