मी काय वाचले - 9
धनंजय जोशी यांनी शिकागोतील वास्तवात भारतातून, थायलंड आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्यना आणि झेन मेडिटेशन या दोन अध्यात्म परंपरेची साधना केली. शिकागोमध्ये "शिकागो मेडिटेशन सेन्टर" ची स्थापना केली. या पुस्तकात त्यांचे अनुभव आणि आठवणी व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकातील - चार मंत्र, मनाचे खेळ, एक नवीन मंत्र हा भाग आवडला. चार मंत्र - १) Don 't make anything - जस असेल तसे पहा. तुम्ही त्याच्यात आपलं तिखट मीठ घालू नका. make anything म्हणजे मनाच्या खेळाबध्दल. (२) Don 't check - चेक म्हणजे काय ? तर आपण जे जे काही अनुभवतो त्यावर "हे बरोबर नाही", "हे ठीक नाही" ही व्यक्ती "जे करते आहे ते चूक आहे" असे शिक्के आपण मारत असतो. (३) Don 't attach to anything - कशामध्ये "अडकून" राहू नये. निरपेक्ष जीवन म्हणजे Don 't attach . प्रेम करावं पण १००% करावं न अडकता करावं. (४) Don 't hold anything - आपण कितीतरी गोष्टी पकडून ठेवत असतो. आपण काय धरून असतो? आपली मत, आपल्या आवडीनिवडी, आपले अनुभव (चांगले किंवा वाईट) आपल्या इच्छा आणि महत्वांकांक्षा आपण सोडायला तयार नसतो. रोज एकदातरी चार मंत्र आठवावेत. मनाचे खेळ - सगळे विचार मनामध्ये गोंधळ घालत असतात असे हे मनाचे खेळ ! आपण नुसते बघायचे असतात. एक नवीन मंत्र - Don 't argue - सुखी राहण्याचे रहस्य म्हणजे माणसाने कुठल्याहि गोष्टीवर वाद घालू नये. पुस्तक "सहज" जमले तर वाचून पहा. वाचनीय आहे. - २०-०८-२०२१


Comments
Post a Comment