मी काय वाचले -10

 


"मला गीता कळायला हवी"  ले. उर्मी उदय निवर्गी

या पुस्तकास डॉ रश्मी भरत घोलप यांची प्रस्तावना आहे.  प्रस्तावनेत त्या म्हणतात - श्रीमद भगवद गीतेतील सर्व अध्यायांचे स्तर सोप्या, सुलभ शब्दात, ओघवत्या भाषेत एक ठायी  समाविष्ट झालेले सुंदरसे पुस्तक म्हणजे ... "मला गीता कळायला हवी" !  मनोगतात लेखिका म्हणते आज लोक निराश होऊन जगण्याची आस हरवून बसत आहेत यातून बाहेर पडायला आपल्या धर्मग्रंथाचाच अभ्यास करायला हवा. तरच मनाची सकारात्मक ताकद वाढेल .. जगणं म्हणजे नक्की काय हे कळेल.  मी कसं जगायला हवंय आणि का हे या पुस्तकातून समजावले आहे. अगदी रोजच्या दैनिंदिन व्यवहारातील दाखले, उदाहरणे देऊन समजावले आहेत.  पुस्तकातील सर्व चोवीस प्रकरणे म्हणजे गीतेतील क्रमाने येणारे अध्यायच आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी याचा एक तृतीयांश सारांश उर्मीताईंनी स्वरचित काव्यातून मांडलेला आहे. पुस्तकातील शेवटची प्रकरणे आहेत ..मी गीता कधी शिकायची ?... मी गीता शिकल्याने काय मिळेल, कसे मिळेल .. अर्थात हीच पुस्तकाची फलश्रुती आहे.  खरंच प्रत्येकाने गीता वाचावी. सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर हे पुस्तक जरूर वाचावे .


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा