मैत्री दिन - 1
आज मैत्री दिवस.. . माझे मन कॅनरा बँकेत रिजनल ऑफिस (RO )काम करीत असताना दिवसाची आठवण झाली. ऑफिस मध्ये काम करताना आमचा सहकारी मित्र मैत्रिणीचा ग्रुप छान जमला होता. ऑफिस कामास प्राधान्य देऊन आम्ही सहकाराचे वाढदिवस, एकमेकांना ग्रीटिंग्स देऊन शुभेच्छा, खानपानात विविध खाद्य मेनू, ट्रिप्स, हुरडा पार्टी, कोजागिरी कार्यक्रमात प्रत्येकजण आपली कला सादर करीत असू. सगळे समारंभ, मासिक सभा दरम्यान ठळक घडामोडी बाबत थोडक्यात माहिती , हिंदी दिवस .... आनंदाने मजेत साजरा करायचो. कधी कधी क्रिकेट आणि कॅरम मॅचेस खेळांचे आयोजन असायचे. बदली निमित्य सेंड ऑफ कार्यक्रमावेळी सहकारीविषयी दोन शब्द मनोगत...एकमेकांची चेष्टा मस्करी करीत असो रंगपंचमी पण खेळत होतो. एकूण आम्ही सारे कॅनबँक फॅमिली सारखे होतो. अधूनमधून वडापाव हा पण जरूर हजर असायचा. गरम गरम असल्यावर काहीजण दोन दोन फस्त करून काहींना फक्त मिरची शिल्लक रहायची.. गंमत असायची.
आज जवळजवळ ३१ वर्षे झाली तरी या सुखद आठवणी अजुनी मनात घर करून आहेत. प्रत्यक्ष संवाद जरी नसला तरी लग्न समारंभात गाठीभेटी घडत आता करोना दिवसात whatsapp वरून भेट आणि संवाद होतोच. आमच्या RO ग्रुपमधील मित्र मैत्रिणीने दिलेले प्रेम, आपुलकी मी कधीच विसरू शकत नाही. आज मैत्रीदिनानिमित्य गत स्मृतींना उजाळा... काही आनंदाचे क्षण आपणाशी share करून आपणास आनंद द्यावा म्हणून हा whatsappa ... आपला लाडका CM ...०१.०८.२०२१
Comments
Post a Comment