वेबिनार - Parallels Between Bhagavad Gita and Psychology.

 




Parallels Between Bhagavad Gita and  Psychology.  : -  या विषयावर डॉ. अरुणा कुलकर्णी आणि श्री रवींद्र कुलकर्णी यांनी  3 ऑगस्ट रोजी गुगल मीटवर -  वेबिनार आयोजित केले होते. भगवद्गीतेतील प्रत्येक अध्याय याचे सार श्री रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले आणि नंतर डॉ.  अरुणा कुलकर्णी यांनी त्याचा संबंध मानसशास्त्रशी कसा आहे -  याचे विश्लेषण केले.  गीतेतील कर्मसंन्यास, सांख्य, अक्षरब्रह्म, भक्ती योग,  ज्ञानयोग,  पुरुषोत्तमयोग गुणत्रय विभाग,  मोक्ष संन्यास, विभूती योग या सर्वांचा मानसशास्त्राशी  कसा संबंध आहे ते सांगताना  IQ  आणि  EQ  यांचा समत्व महत्त्वाचा, जोहारी विंडो, ग्रोथ अँड फिक्स माईंड सेट यावर अधिक माहिती दिली.डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी भगवद्गीता  दैनंदिन जीवनात मध्ये कशी आचरणात आणावी... याबाबत काही टिप्स दिल्या.. स्थितीत गोंधळलेल्या स्थितीत निर्णय घेऊ नको, निष्काम कर्म, ध्यान, सात्विक आहार, आपला ओपन एरिया वाढवणे, सेल्फ आवरनेस, सेल्फ एनालिसिस, भावनेच्या आहारी न जाता संयम महत्त्वाचा असतो.या कार्यक्रमास श्री.  धनंजय गोखले यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे असे दोघांनी नमूद केले. कार्यक्रमाची शेवटी  श्रोत्यांच्या काही प्रश्नांना समाधानकारक उत्तर दोघांनी दिली. हा वेबिनार अत्यंत श्रवणीय आणि माहितीपूर्वक झाल्याचे सर्वांनी सांगितले. दोघांचे आभार मानले. या सुंदर अशा वेबनारसाठी माईंड मॅटर्स या संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद. 


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा